बापरे! CBI च्या ताब्यातील 45 कोटींचं 103 किलो सोनं गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 01:55 PM2020-12-12T13:55:04+5:302020-12-12T13:57:30+5:30

CBI Gold worth 45 crore rupees : सोन्यांच्या विटा आणि दागिन्यांच्या स्वरुपात 400.5 किलो ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं.

gold worth 45 crore rupees seized and placed in safe custody by cbi goes missing | बापरे! CBI च्या ताब्यातील 45 कोटींचं 103 किलो सोनं गायब

बापरे! CBI च्या ताब्यातील 45 कोटींचं 103 किलो सोनं गायब

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. सीबीआयने छापेपारी दरम्यान 103 किलो ग्रॅम सोनं जप्त केलं होतं. या सोन्याची एकूण किंमत तब्बल 45 कोटी होती. मात्र सीबाआयच्या ताब्यात असलेलं हे सोनं आता अचानक गायब झालं आहे. कोर्टाने या प्रकरणात तामिळनाडू सीबी-सीआयडीला चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या टीमने 2012 साली चेन्नईमधील सुराना कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ऑफिसवर छापा टाकला होता.  या कारवाईत सोन्यांच्या विटा आणि दागिन्यांच्या स्वरुपात 400.5 किलो ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं. हे सर्व सोनं सीबीआयच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होते. मात्र आता यामधील तब्बल 103 किलोग्रॅम सोनं गायब असल्याचं उघड झालं आहे.

सोनं ज्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच्या 72 किल्ली चेन्नईच्या प्रिन्सिपल स्पेशल कोर्टाला देण्यात आल्या होत्या असा दावा सीबीआयने केला आहे. छापेपारीच्या दरम्यान सीबीआयनं सर्व सोनं एकत्र आणलं होतं. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सुराना कॉर्पोरेशन यांच्यातील वादावर तोडगा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या लिक्विडेटरला हे सोनं सोपवताना त्याची विभागणी करण्यात आली होती. याच कारणामुळे सोन्याच्या वजनात आता फरक पडला असल्याचं स्पष्टीकरण सीबीआयनं दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अधिकाऱ्याने दिलं भ्रष्टाचाराविरोधात जोरदार भाषण अन् तासाभरातच झाली लाच घेताना अटक

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भाषण दिल्यानंतर अवध्या तासाभरात पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. माधोपूरमध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरारष्ट्रीय दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. डीएसपी मीणा हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात जोरदार भाषण केलं. "आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा" असं आवाहनही मीणा यांनी लोकांना केलं होतं.

भाषणानंतर अवघ्या एक तासात झाली अटक

डीएसपी मीणा यांना विशेष म्हणजे भाषणाच्या एक तासानंतर तब्बल 80 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच त्यांना लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यालाही अटक झाली आहे. एसीबीच्या कार्यालयात असलेल्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला एसीबीला अनेक प्रयत्नांनंतर डीएसपी मीणा यांच्याविरोधात पुरावे मिळाले होते. या पुराव्यांच्या आधारे एसीबीची टीम आणखी काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करु शकते.

Web Title: gold worth 45 crore rupees seized and placed in safe custody by cbi goes missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.