कावड यात्रेत 12.5 किलो सोनं अंगावर घातलेले 'गोल्डन बाबा'

By Admin | Published: July 28, 2016 11:36 AM2016-07-28T11:36:34+5:302016-07-28T11:36:34+5:30

हरिद्वारला कावड यात्रेत अंगावर तब्बल 4 कोटी किंमतीचं 12.50 किलो सोनं घातलेलं गोल्डन बाबा सहभागी झाले आहेत

'Golden Baba' on 12.5 kg of gold weaving | कावड यात्रेत 12.5 किलो सोनं अंगावर घातलेले 'गोल्डन बाबा'

कावड यात्रेत 12.5 किलो सोनं अंगावर घातलेले 'गोल्डन बाबा'

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मेरठ, दि. 28 - हरिद्वारला कावड यात्रेत जाणा-यांमध्ये 'गोल्डन बाबा' हा सध्या चर्चेचा विषय बनत आहे. हे कोणी साधारण बाबा नसून यांना दागिन्यांची प्रचंड आवड आहे. अंगावर तब्बल 4 कोटी किंमतीचं 12.50 किलो सोनं चढवलेल्या गोल्डन बाबांना पाहण्यासाठी एकच गर्दी झालेली असते. गोल्डन बाबांच्या दागिन्यांमध्ये महागडे हिरे, माणिकदेखील आहेत. हातामधील महागड्या अंगठ्या आणि इतर दागिन्यांच वजन तब्बल 12.5 किलो आहे.
 
एवढंच नाही तर बाबांकडे हि-यांनी जडलेलं घड्याळही आहे, ज्याची किंमत 27 लाख आहे. यात्रेदरम्यान बाबा वेगवेगळ्या शहरात थांबतात. त्यांना पाहण्यासाठी भक्तांचीदेखील झुंबड उडालेली असते. गोल्डन बाबांच्या सुरक्षेसाठी 25 पोलीस कर्मचारी सदैव तैनात असतात. 
 
'इतकं सोनं अंगावर घालणं जोखमीचं आहे याची मला कल्पना आहे. पण मी क्वचितत अंगावरील दागिने काढतो. आणि पोलीस प्रशासन आपल्याला मदत करण्यासाठी तयार असताना आपल्याला घाबरण्याची काय गरज', असं गोल्डन बाबांचं म्हणणं आहे.  इतकं सोनं वापरण्यावरुन भक्तांनीही त्यांना अनेकवेळा विचारलं. पण मला लहानपणापासूनच सोन्याची प्रचंड आवड आहे असं गोल्डन बाबा सांगतात. गोल्डन बाबा सध्या भक्तांनी दिलेल्या देणगीवरच जगत आहेत. त्यांचे भक्तदेखील देणगीत त्यांना सोन्याच्या वस्तूच देत आहेत. 
या गोल्डन बाबां'चं खरं नाव सुधीर कुमार आहे. बाबा होण्याअगोदर ते दिल्लीत कपड्याचे व्यापारी होते. 'एक दिवस मला आपण खूप पाप केल्याची जाणीव झाली, आणि मी साधू होऊन गरजूंची मदत करण्याचा निर्णय घेतला. मी दरवर्षी कमीत कमी 200 मुलींचं लग्न लावून देतो, आणि त्यांचा खर्चही उचलतो', असं गोल्डन बाबांनी सांगितलं आहे. 
 
गोल्डन बाबा दरवर्षी कावड यात्रेत सहभागी होतात. बुधवारी गोल्डन बाबा आपल्या 200 अनुयायी आणि सुरक्षारक्षकांसोबत मेरठला पोहोचले. ही त्यांची 24 वी कावड यात्रा आहे. 
 

Web Title: 'Golden Baba' on 12.5 kg of gold weaving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.