इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १ लाखांपर्यंत पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:35 PM2022-09-24T12:35:32+5:302022-09-24T12:38:47+5:30
Indian Oil Corporation Limited Recruitment: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने इंजिनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. पाईपलाईन डिव्हिजनअंतर्गत देशभरात रिक्त पदे आहेत. इ
नवी दिल्ली - इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने इंजिनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. पाईपलाईन डिव्हिजनअंतर्गत देशभरात रिक्त पदे आहेत. इच्छुक उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईटवर १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत plapps.indianoil.in या संकेतस्थळावर पाठवू शकता. आयओसीएल व्हेकन्सी २०२२ वर पात्रता, वेतन आणि इतर अधिक सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
वयोमर्यादेचा विचार केल्यास या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय किमान १८ वर्षे असलं पाहिजे. तर कमाल वयोमर्यादा ही २६ वर्षे एवढी निर्धारित करण्यात आली आहे. पगाराचा विचार केल्यास इंजिनियर असिस्टंटच्या पदासाठी २५ हजार ते १ लाख ५ हजार रुपयांपर्यंत महिना पगार मिळेल. तर टेक्निकल अटेंडंट पदांवर नियुक्ती झालेल्यांना २३ हजार रुपयांपासून ७८ हजार रुपये महिना पगार मिळेल.
उमेदवारी अर्ज करण्यासाठीच्या शुल्काचा विचार केल्यास जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये एवढे शुल्क आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी वर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रियेचा विचार केल्यास उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि स्कील, प्रोफिशिएन्सी आणि फिजिकल टेस्टच्या आधारावर केलं जाईल. जे इच्छुक उमेदवार या पदांवर नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील. त्यांनी https://plapps.indianoil.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
इंजिनियरिंग असिस्टंट पदासाठी इच्छुक उमेदवार कुठल्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षांचा फुट टाइम डिप्लोमा केलेला असावा.
इंजिनियरिग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) ग्रेड-IV पदासाठी इच्छुक उमेदवारा कुठल्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षांचा फुल टाइम डिप्लोमा केलेला असावा.