Government Job: पैसे छापायचेत? केंद्राच्या टांकसाळीत नोकरीची सुवर्णसंधी; पदवी, आयटीआयधारक हवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 01:53 PM2021-01-19T13:53:03+5:302021-01-19T14:02:34+5:30
Government Job: इंडियन गव्हर्नमेंट मिंटद्वारे १७ जानेवारीला जाहिरात (सं. IGMK/HR (Estt.)/Rect./01/2020) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशिअन आणि अन्यसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
केंद्र सरकारची मिनी रत्न कंपनी म्हणजेच टांकसाळमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. कोलकाता येथील टांकसाळीमध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी जाहिरातही काढण्यात आली आहे.
इंडियन गव्हर्नमेंट मिंटद्वारे १७ जानेवारीला जाहिरात (सं. IGMK/HR (Estt.)/Rect./01/2020) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशिअन आणि अन्यसाठी एकूण 54 पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आयजीएम-एसपीएमसीआयएलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन igmkolkata.spmcil.com अर्ज करायचा आहे. अर्जाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 20 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर शेवटची मुदत ही 19 फेब्रुवारी असणार आहे. अर्ज आणि जाहिरातीच्या आवश्यक लिंक खाली देण्यात आल्या आहेत.
असा करा अर्ज...
इच्छुक उमेदवारांनी आयजीएम-एसपीएमसीआयएलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे. यानंतर तेथील करिअर सेक्शनच्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर संबंधित भरतीच्या सेक्शनमध्ये 20 जानेवारी 2021 पासून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाईन फॉर्मच्या लिंकवर क्लिक करावे. ही लिंक उद्यापासून अॅक्टिव्ह होणार आहे. अर्जामध्ये आवश्यक असलेली माहिती भरावी लागणार आहे.
अर्जासाठी 600 रुपये शुल्क आकारले जाणार आहे जे ऑनलाईन भरता येणार आहे.
रिक्त पदे आणि पगार...
सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशंस) - 10 जागा. 26,000 ते 1,00,000 रुपये
इंग्रेवर 3 - 6 पदे. 8,500 ते 20,850 रुपये
ज्युनियर ऑफिस असिस्टंट - 12 जागा. 8,350 ते 20,470 रुपये
ज्युनियर बुलियन असिस्टंट - 10 जागा. 8,350 ते 20,470 रुपये
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) - 16 जागा. 7,750 ते 19,040 रुपये
शिक्षणाची अट...
- सुपरवायझरसाठी मॅकेनिकल, सिव्हील, मेलर्जीकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा. वय 18 ते 30 वर्षे.
- इंग्रेवर 3 साठी फाईन आर्टमध्ये पदवी. वय 18 ते 28 वर्षे.
- ज्युनियर ऑफिस असिस्टंट व ज्युनियर बुलियन असिस्टंटसाठी कोणत्याही विषयातील पदवी. इंग्रजी किंवा हिंदीमध्ये 40 शब्द प्रती मिनिट टायपिंग. वय 18 ते 28 वर्षे.
- ज्युनियर टेक्निशियनसाठी इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट, सोबत एनएसी सर्टिफिकेट. वय 18 ते 25 वर्षे.
भारत सरकारच्या टांकसाळ भरतीची जाहिरात...इथे क्लिक करा
उद्या इथे मिळणार ऑनलाईन अर्जाची लिंक...इथे क्लिक करा