गोल्डन टेंपलमध्ये दानपेटीत 500, 1000च्या नोटा टाकण्यास मनाई
By admin | Published: November 10, 2016 05:55 PM2016-11-10T17:55:27+5:302016-11-10T17:55:27+5:30
पंजाबमधील शिखांचं पवित्र स्थान असलेल्या गोल्डन टेंपलमध्येही आता 500 आणि 1000च्या नोटा दान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. 10 - पंजाबमधील शिखांचं पवित्र स्थान असलेल्या गोल्डन टेंपलमध्येही आता 500 आणि 1000च्या नोटा दान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गोल्डन टेंपलमध्ये जवळपास दररोज 1 लाखांहून अधिक भाविक भेट देतात. त्यातील बरेसचे लोख रोख रक्कम दान करत असतात. मात्र आता 500 आणि 1000च्या नोटा दानपेटीत टाकण्यास मज्जाव केल्यानं अनेक भाविकांना याचा धक्का बसला आहे.
आमच्या कर्मचा-यांना प्रसाद आणि पूजेच्या काऊंटरवर 500 आणि 1000च्या नोट स्वीकारू नये, असं शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती(एसजीपीसी)च्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. मात्र पिगी बँक आणि दानपेटीत भाविकांसाठी 500 आणि 1000 रुपये टाकण्यापासून रोखताही येणार नाही, असंही त्यांनी मान्य केलं आहे.
ते म्हणाले, एसजीपीसीनं पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या संस्थानांना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता भाविकांनाही 500 आणि 1000च्या नोटा मंदिरांमध्ये दान करता येणार नाहीत.