जवानांना सकस अन्न दिले जाते
By admin | Published: February 10, 2017 01:09 AM2017-02-10T01:09:30+5:302017-02-10T01:09:30+5:30
सशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
सशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे.
एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट अन्नाची तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सरकारने हा खुलासा केला, हे विशेष.
सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला निकृष्ट अन्न दिले जात असल्याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (सीआरपीएफ) अशा प्रकारच्या दोन तक्रारी मिळाल्या आहेत. तथापि, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, जवानांना सकस अन्न मिळावे, यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. त्यानुसार, अधिकाऱ्यांना चौक्यांच्या भेटीदरम्यान जवानांचे राहणीमान, कपडे, जेवण यासह त्यांच्या उपकरणांच्या स्थितीची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.