गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 02:04 PM2020-07-01T14:04:41+5:302020-07-01T14:07:00+5:30

बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Good job opportunities in SBI for Villagers; Salary up to Rs 25000 | गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

Next

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे गावाकडे गेलेल्या कामगारांना तिथेच रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकार करत आहेत. यामुळे आता तिथे पैसा खेळू लागणार असल्याने स्टेट बँकेनेही कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.  


भारतीय स्टेट बँकेने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 


ही भरती विक्री आणि कॉल सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. कारण क्रेडिट कार्ड व्यवसायाला वाढविण्याचा हेतू यामागे आहे. यामुळे ग्रामीण भागातील आणि कृषी क्षेत्रातील अनुभवी लोकांना नोकरी दिली जाणार आहे. आर्थिक वाढीसाठी बँकेने वेगळा विभागही स्थापन केला आहे. यामध्ये 400 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. एसबीआय कार्डस् काही महिन्यांपूर्वीच शेअर बाजारामध्ये नोद झाले आहे. यामुळे हा विभाग आता व्यवसाय वाढीक़डे लक्ष देणार आहे. केवळ विक्री आणि कॉल सेंटरमध्ये जवळपास 1500 लोकांची भरती केली जाणार आहे. 


या भरतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचारी ज्युनिअर आणि काही मध्यम श्रेणीतील असणार आहेत. त्यांना 15 ते 25 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. गेल्या वर्षीही एसबीआयने 2000 अधिकारी आणि 8000 क्लार्कची भरती केली होती. ही भरती गुणवत्तापूर्ण सेवा आणि बँकिंग सुविधेची उपलब्धी वाढविण्यासाठी करण्यात आली होती. यासाठी 68000 कस्टमर पॉईंटही वापरण्यात येणार होते. 


119 जागांसाठी भरती प्रक्रिया
भारतीय स्टेट बँकेने स्पेशल कॅडर ऑफिसर्सच्या ११९ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रकियेसाठी अर्ज मागवण्यात आले असून, पात्र आणि इच्छुक उमेदवार १३ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. तसेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली आहे.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

Web Title: Good job opportunities in SBI for Villagers; Salary up to Rs 25000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.