चांगले कर्म व्यवहारात हवे : भागवत

By admin | Published: December 18, 2014 10:39 PM2014-12-18T22:39:38+5:302014-12-19T00:17:48+5:30

फोटो

Good karmic transaction needs: Bhagwat | चांगले कर्म व्यवहारात हवे : भागवत

चांगले कर्म व्यवहारात हवे : भागवत

Next

फोटो
१८१२२०१४-आरटीएन-०१.जेपीजी
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते डॉ. गो. ब. देगलूरकर यांनाडॉ. केशव हेडगेवार पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अरविंद जाधव, प्रकाश देशपांडे उपस्थित होते.


चिपळूण : मनुष्य हा संवेदनशील असून, त्याला सुखदु:खाची संवेदना आहे. योग्यतेनुसार वागायला शिकले पाहिजे. ग्रंथातील गोष्टी आचरणात आणून चांगले कर्म व्यवहारात उतरायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे आज (गुरुवार) सायंकाळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. केशव हेडगेवार पुरस्कार पुण्यातील डेक्कन अभिमतविद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. ब. देगलूरकर यांना डॉ. भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, लोटिस्माचे अध्यक्ष अरविंद जाधव, कार्यवाह प्रकाश देशपांडे यावेळी उपस्थित होते.
ज्ञानसाधनेसाठी एक तपश्चर्या लागते. जगासमोर अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण ते फसले. भाषणं देऊन काम होत नाही. त्यासाठी निष्ठेने साधना करावी लागते. कर्मामध्ये भक्ती असेल तर ती कार्याला हितकारी बनविते, कोणतेहीे कर्र्म सुंदर असते. त्यासाठी आत्मियता लागते. ज्ञान, भक्ती, कर्म यांची सांगड असल्याशिवाय काम होत नाही. ज्ञानग्रहण करायला विवेक लागतो. ज्ञानाची माहिती देऊन चालत नाही. यासाठी मनन, चिंतन, वाचन याची जोड द्यायला हवी. खरे ज्ञान जो व्यवहारात उतरवतो तो सच्चा ज्ञानी होय. विवेक उत्तम करायचा असेल तर वाचनाचा आधार घ्यायला हवा. अभ्यासाला फार महत्व आहे. जग कुठे आहे, आपण काय करीत आहोत, याचे भान असले पाहिजे. (वार्ताहर)

...हा तर भाग्याचा क्षण
डॉ. हेडगेवार यांच्या नावाचा पुरस्कार सरसंघचालक मोहन भागवत यंाच्या हस्ते मिळाला, आयुष्यातील या क्षणाला तोड नाही. मी खरोखर भाग्यवान आहे म्हणूनच ही संधी मला मिळाली. आपण आपल्याला ओळखले तर आपली ओळख जगाला होते. पशूनाही विचार आहेत. पण, त्यांच्या व माणसाच्या विचारात फरक आहे. विचाराच्या आधारावर आपले अस्तित्व आहे.

Web Title: Good karmic transaction needs: Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.