शोकमग्न वातावरणात लाडक्या भूमीपुत्रास निरोप
By admin | Published: February 27, 2016 11:33 PM2016-02-27T23:33:10+5:302016-02-27T23:33:10+5:30
जळगाव- शेतीला बळकटी व शेतकर्यांना उभारी देण्यासाठी सूक्ष्मसिंचन, टिश्यू रोपांचे आयुध देणारे लाडके भूमीपुत्र भवरलाल जैन (मोठे भाऊ) यांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रूू नयनांनी निरोप दिला. जैन हिल्स परिसर शोकमग्न झाला होता. जैन यांच्या अंत्यदर्शनावेळी अनेक मान्यवरांना गहिवरून आले. असा भूमीपुत्र होणे नाही..., भवरलाल जैन अमर रहे, अशी भावना शेतकरी, उपस्थितांनी व्यक्त केली.
Next
ज गाव- शेतीला बळकटी व शेतकर्यांना उभारी देण्यासाठी सूक्ष्मसिंचन, टिश्यू रोपांचे आयुध देणारे लाडके भूमीपुत्र भवरलाल जैन (मोठे भाऊ) यांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रूू नयनांनी निरोप दिला. जैन हिल्स परिसर शोकमग्न झाला होता. जैन यांच्या अंत्यदर्शनावेळी अनेक मान्यवरांना गहिवरून आले. असा भूमीपुत्र होणे नाही..., भवरलाल जैन अमर रहे, अशी भावना शेतकरी, उपस्थितांनी व्यक्त केली. बैलगाडीवरून पार्थिवाची यात्राजैैन हिल्सवरील कांताई निवासस्थानामधून जैन धर्मानुसार मांगलिक व इतर विधी पार पाडल्यानंतर पार्थिव बैलगाडीवर ठेवण्यात आले. पुष्पहारांनी सजविलेली बैलगाडी जैन यांचे पुत्र अशोक, अनिल, अजित व अतुल यांनी ओढली. त्यांचे नातवंडही या वेळी उपस्थित होते. राष्ट्रध्वजामध्ये असलेल्या जैन यांच्या पार्थिवाच्या या यात्रेत जैन यांचे चाहते, जळगावकर, ठिकठिकाणचे मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. २.२८ वाजता पार्थिव टिश्यूकल्चर प्रयोगशाळेनजीकच्या शेत वजा मैदानावर आले. या मैदानावर पार्थिवानजीक जैन कुटुंबीय एकत्र आले. १०८ पुरोहितांनी मंत्रोच्चार सुरू केले. हे मंत्रोच्चार आटोपले तोपर्यंत पार्थिव अंत्यसंस्कारासाठी उभारलेल्या चौथर्यापासून काही अंतरावर ठेवण्यात आले होते. पाऊले वळली जैन हिल्सवरअंत्यसंस्कार तीन वाजेपासून सुरू होणार असल्याने दुपारी २ वाजेपासूनच मोठ्या भाऊंचे चाहते, मान्यवर, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी जैन हिल्सवर दाखल होत होते. रखरखत्या उन्हातहीपाहता पाहता हजारो चाहते, नागरिक एकत्र झाले. भव्य मंडप, वाहनतळअंत्यसंस्कार स्थळानजीक सुमारे २० हजार लोक बसू शकतील एवढा मंडप उभारण्यात आला होता. उपस्थितांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जैन हिल्सवर जुन्या राजा भोज सभागृहावर आणि जैन हिल्ससमोरील मुख्य रस्त्यानजीकच्या मैदानावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. अंत्यसंस्काराच्या वेळेस विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ.सतीश पाटील, गुलाबराव पाटील, हरिभाऊ जावळे, प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, स्मिता वाघ, खान्देश विकास आघाडीचे नेते रमेशदादा जैन, कांतीलाल जैन, दलुभाऊ जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, राजेश जैन, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि.प.सीईओ आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक डॉ.जालींदर सुपेकर, माजी आमदार आर.ओ.पाटील, महेंद्रसिंग पाटील, ॲड.रवींद्र पाटील, केळी महासंघाचे भागवत विश्वनाथ पाटील, जैन इरिगेशनचे अधिकारी मनोज लोढा, आर.सुब्रह्मण्यम, डॉ.जे.के.दोषी, डी.एम.जैन, डॉ.सुभाष चौधरी, आर.बी.जैन, शशीकांत जैन आदींनी जैन यांचे अंत्यदर्शन घेतले.