खूशखबर! पुढील वर्षी होऊ शकते ४४% पगारवाढ; सरकार स्थापणार आठवा वेतन आयोग?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 09:28 AM2023-02-22T09:28:38+5:302023-02-22T09:28:59+5:30
२०२४ मध्ये होणार असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांना भेट देण्याची तयारी चालविली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सातव्या वेतन आयोगानंतर आता केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करणार आहे. पुढील वर्षी केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४४ टक्के वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजार रुपये आहे. ८व्या वेतन आयोगात ३.६८ टक्के फिटमेंट फॅक्टर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४४.४४ टक्के वाढ होऊ शकते. किमान वेतन १८ हजार रुपयांवरून थेट २६ हजार रुपये होईल.
केव्हा लागू होईल आठवा वेतन आयोग?
सरकार २०२४ मध्ये आठवा वेतन आयोग गठित केला जाऊ शकतो. तसेच त्याची अंमलबजावणी २०२६ पासून केली जाऊ शकते. २०२४ मध्ये होणार असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांना भेट देण्याची तयारी चालविली आहे.