खूशखबर! यंदा ७० लाख रोजगार निर्माण होणार; अर्थव्यवस्था रुळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:07 AM2021-08-27T11:07:39+5:302021-08-27T11:08:05+5:30
कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात श्रमिक वर्गाचा मोठा समावेश आहे. कोरोनाकहर ओसरल्याने आता कोरोनापूर्व स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाची ओसरलेली दुसरी लाट आणि सैल होऊ लागलेले निर्बंध या सर्व पार्श्वभूमीवर आता बाजारही सावरू लागला आहे. अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सकारात्मक संकेत मिळू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशात ७० लाख रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे.
ब्ल्यू कॉलर कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार
कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात श्रमिक वर्गाचा मोठा समावेश आहे. कोरोनाकहर ओसरल्याने आता कोरोनापूर्व स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
या क्षेत्रातून मागणी सर्वाधिक
लॉजिस्टिक्स
ई-कॉमर्स
एफएमसीजी
रिटेल
वस्त्रप्रावरणे
आरोग्य देखभाल
डेटा तज्ज्ञ
आयटी कंपन्या
बँकिंग
विमा
कोणत्या प्रकारचे रोजगार उपलब्ध?
सप्लाय एक्झिक्युटिव्ह, ड्रायव्हर्स, हाऊसकीपर्स, सेल्स एक्झिक्युटिव्ह, स्टिचिंग मशीन ऑपरेटर्स, सुरक्षा कर्मचारी, प्रशासकीय, वैद्यकीय प्रतिनिधी, गोदामातील कर्मचारी
किती रोजगार निर्माण होतील? यंदाच्या आर्थिक वर्षात किमान ७० लाख रोजगारांची निर्मिती होईल, असा अंदाज आहे.