खुशखबर ! देशात 75 नवीन मेडिकल कॉलेज, 15 हजार डॉक्टरांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 07:30 PM2019-08-28T19:30:23+5:302019-08-28T19:33:14+5:30
देशातील वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची असलेली कमतरता लक्षात घेऊन 75 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - वैद्यकीय क्षेत्रासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. देशात नवीन 75 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. त्यासाठी, 24 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर, सन 2020-21 पर्यंत या महाविद्यालयांची स्थापना होईल, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केलंय.
देशातील वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची असलेली कमतरता लक्षात घेऊन 75 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये, ज्याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्याठिकाणी प्राधान्यक्रमाने हे महाविद्यालय बांधण्यात येणार आहेत. तर, या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 15 हजार डॉक्टरांची भरती करण्यात येईल, असेही जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जावडेकर यांनी राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीकाही केली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबतही केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात 60 लाख मेट्रीक टन ऊस उत्पादन करण्यासाठी एक्सपोर्ट (निर्यात) सबसिडी देण्यात येणार आहे. देशातून 60 लाख मेट्रीक टन साखरेची निर्यात करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना 6 हजार कोटी रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे. ही सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे.
75 new #MedicalColleges to be set up with expenditure of Rs 24,375 crore@HRDMinistry@airnewsalerts@DDNewsHindipic.twitter.com/cBiejvoZNf
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) August 28, 2019
LIVE: Shri @PrakashJavdekar is addressing a press conference at BJP HQ. https://t.co/2pmYa9r4O4
— BJP (@BJP4India) August 28, 2019