खूशखबर ! रेल्वेमध्ये बंपर भरती, एक लाख तरुणांना मिळणार नोक-या

By admin | Published: July 14, 2017 02:59 PM2017-07-14T14:59:33+5:302017-07-14T15:02:55+5:30

रेल्वेमध्ये याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती झालेली नाही

Good news! Bumper recruitment in railway, one lakh youth get jobs | खूशखबर ! रेल्वेमध्ये बंपर भरती, एक लाख तरुणांना मिळणार नोक-या

खूशखबर ! रेल्वेमध्ये बंपर भरती, एक लाख तरुणांना मिळणार नोक-या

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - रेल्वे एक लाखाहून जास्त रिक्त पदं भरण्याची तयारी करत आहे. रेल्वेमधील नोक-यांच्या मुद्द्यावरुन नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर असणा-या मोदी सरकारसाठी हा निर्णय फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. सध्या तरी या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेशी संबंधित पदांची संख्या जास्त असेल. मात्र ही भरती प्रक्रिया सुरु होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. रेल्वेमध्ये याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती झालेली नाही. 
 
आणखी वाचा
इन्फोसिस करणार 20 हजार कर्मचा-यांची भरती
जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा
 
रेल्वे युनिअनचे नेते शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या रेल्वेत सुरक्षेशी संबंधित जवळपास अडीच लाखाहून जास्त पदं रिकामी आहेत. जर सरकार ही सर्व पदं भरत असेल तर हा एक चांगली बाब आहे. "रेल्वे युनिअन गेल्या खूप काळापासून रेल्वेमधील रिक्त जागा भरुन काढण्याची मागणी करत आहे. जर रेल्वेला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर सर्वात आधी सुरक्षेशी संबंधित पदं भरली गेली पाहिजेत", असं शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितलं आहे. 
 
भाजपा सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेकडून एक लाख जागा भरण्याचा निर्णय मोदी सरकारसाठी दिलासा देणारा ठरु शकतो. पक्षाचं म्हणणं आहे, भलेही एक लाख जागांसाठी नोकरी असली, तरी यासाठी लाखोंच्या संख्येने तरुण अर्ज करतील. यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात नोकरभरती होत असल्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल.
 
बेरोजगारीच्या मुद्यावरुन विरोधकांनी नेहमीच मोदी सरकारला धारेवर धरत टीका केली आहे. स्वत: मोदी सरकारने बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधकांना उत्तर देणं कठीण जात असल्याचं मान्य केलं होतं. भाजपाच्या अनेक नेत्यांनी कबुली दिली आहे की, रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारला कठीण परिस्थितीचा समाना  करावा लागत आहे. खासकरुन नोटाबंदीनंतर केंद्र सरकारला नोटाबंदीमुळे लोकांच्या हातून रोजगार केल्याची टीका सहन करावी लागत आहे. त्यामुळेच हा निर्णय त्यांना दिलासा देणारा ठरु शकतो. 
 
मुंबई मेगा भरतीच्या प्रतिक्षेत
शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. मात्र, रेल्वे पोलिसांचे सद्यस्थितीचे मनुष्यबळ पाहता, रेल्वे पोलीस (जीआरपी) दलाला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.
१९८१ ते २०१४ या कालावधीत केवळ २३९ पोलीस अधिकारी आणि ३,७८० पोलीस कर्मचारी भरती झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. २००० साली ८७ अधिकारी व ७२३ कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. २०१४ साली रेल्वे पोलीस दलात १०० पोलिसांची भरती झाली होती. मात्र त्यानंतर, अद्यापपर्यंत रेल्वे पोलीस ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.
 

Web Title: Good news! Bumper recruitment in railway, one lakh youth get jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.