खूशखबर! तीन औषधांच्या मिश्रणानं ठीक होतात कोरोनाचे रुग्ण; डॉक्टरांना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 09:03 AM2020-04-17T09:03:36+5:302020-04-17T09:06:13+5:30

काही वेगवेगळ्या औषधांनीही कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होत असल्याचा दावा करण्यात येतो आहे.

Good news! Corona patients recover from a combination of three drugs; Doctors trust vrd | खूशखबर! तीन औषधांच्या मिश्रणानं ठीक होतात कोरोनाचे रुग्ण; डॉक्टरांना विश्वास 

खूशखबर! तीन औषधांच्या मिश्रणानं ठीक होतात कोरोनाचे रुग्ण; डॉक्टरांना विश्वास 

Next

नवी दिल्लीः जागतिक महारोगराई असलेल्या कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. जगातील अनेक देश कोरोनावर लस बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण काही वेगवेगळ्या औषधांनीही कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होत असल्याचा दावा करण्यात येतो आहे. मुंबईतल्या एका डॉक्टर्सनं सांगितलं की, काही औषधांच्या मिश्रणानं कोरोनाचे रुग्ण बरे झालेले आहेत.

स्वाइन फ्लू, मलेरिया आणि एचआयव्हीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचं मिश्रण करून कोरोनाग्रस्त रुग्णाला दिल्यावर तो बरा होत असल्याचा दावा डॉक्टर्सनं केला आहे. परंतु त्या डॉक्टरनं कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय अशा प्रकारे औषध घेण्यास मज्जाव केला असून, लोकांना सावधान केलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, आयसीएमआरनं मार्चमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर स्वाइन फ्लूमध्ये वापरण्यात येणार टॅमिफ्लू, मलेरियातील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि एचआयव्हीमध्ये वापरलं जाणार लोपिनवीरचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. काही कोरोनाबाधित रुग्णांवर हे औषध रामबाण ठरत असल्याचंही डॉक्टर्सनं सांगितलं आहे. मनुष्याचं शरीर आणि त्याच्या शरीराची क्षमता वेगवेगळी असल्यानं कोणत्याही डॉक्टर्सच्या सल्लाशिवाय अशी घेतली जाऊ नयेत, असंसुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: Good news! Corona patients recover from a combination of three drugs; Doctors trust vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.