डायबेटिस पेशंट्ससाठी खुशखबर. इन्सुलिनच्या इंजेक्शनला द्या आता सुट्टी
By admin | Published: May 19, 2017 06:27 PM2017-05-19T18:27:51+5:302017-05-19T18:27:51+5:30
जगात सर्वाधिक डायबेटिक पेशंट असणार्या भारतीयांसाठी नवं संशोधन ठरणार उपयुक्त. डायबेटिस कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स
Next
- मयूर पठाडे
डायबेटिसला आपण आता इतकं किरकोळ समजायला लागलो आहोत, की त्याकडे फारसं कोणी लक्षही देत नाही. त्याचं कारण एकच. जिकडे पाहावं तिकडे आपल्याला डायबेटिस पेशंट दिसतात. इतक्या लोकांना डायबेटिस आहे, मग आपल्याला आहे, तर त्यात काय विशेष, असं म्हणून या विकारातील गांभिर्यताच आपण हरवून टाकली आहे. पण अशा डायबेटिस पेशंट्ससाठी आता एक खुशखबरही आहे. इन्सुलिनला पर्यायी पण इन्सुलिनच्या तुलनेत खूपच प्रभावी आणि कमीत कमी दुष्परिणाम करणारं औषध आता विकसित करण्यात आलं आहे.
या घ्या सोप्प्या ट्रिक्स..
व्यायाम करून तुम्हाला घाम गाळायचाच नसेल, तर काही अगदी सोप्या ट्रिक्स आहेत. त्या तरी कराल की नाही?
1- रात्री अल्होहोल, कॅफिन आणि स्पायसी फूड आवर्जून टाळा.
2- तुमच्या झोपायच्या खोलीतलं वातावरण काहीसं कुल ठेवा.
3- तिथे बाहेरुन फारसा प्रकाश आणि आवाज येणार नाही याची काळजी घ्या.
4- झोपायची वेळ ठरवून घ्या, आणि रोज त्याच वेळी झोपायला जा. झोपा.
बघा, तुमच्या डायबेटिसमध्ये नक्कीच फरक पडेल.