केंद्र सरकार देणार खूशखबर, शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:52 AM2023-04-27T06:52:36+5:302023-04-27T06:53:28+5:30
केंद्र सरकार खतनिर्मितीसाठी नैसर्गिक वायूवरील व्हॅट कमी करण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली : नागरिकांना कमी किमतीत सीएनजी-पीएनजी मिळावा म्हणून सरकारने नुकतीच नैसर्गिक वायूची किंमत कमी केली आहे. आता शेतकऱ्यांना स्वस्तात युरिया उपलब्ध करून देण्यासह त्यावर दिले जाणारे अनुदान कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. केंद्र सरकार खतनिर्मितीसाठी नैसर्गिक वायूवरील व्हॅट कमी करण्याच्या तयारीत आहे.
राज्य सरकारचा व्हॅट
आंध्र प्रदेश २४.५%
गुजरात १५%
आसाम १४.५%
कर्नाटक १४.५%
राजस्थान १०%
पंजाब १३%