PM KISAN Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता आज मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:21 AM2021-05-14T08:21:20+5:302021-05-14T08:25:32+5:30

PM Kisan Samman Nidhi 8th installment date: पीएम किसान योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वळते केले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकली जाते. आतापर्यंत .15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

Good news for farmers; PM Kisan Samman Nidhi 8th installment, 2000 rs will announced by Narendra Modi today | PM KISAN Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता आज मिळणार

PM KISAN Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता आज मिळणार

Next

PM KISAN Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM KISAN Yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा आठवा हप्ता जारी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते आज सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानुसार (पीएमओ) आज 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिकची रक्कम वळती केली जाणार आहे. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमरदेखील उपस्थित राहणार आहेत. (Prime Minister Narendra Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme on 14 May at 11 AM. )


पीएम किसान योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वळते केले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकली जाते. आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. 


आधी आलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारांनी Rft (Request For Transfer) Sign केले आहे. तसेच केंद्र सरकारनेही Fto (Fund Transfer Order) काढली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये Rft Signed by State For 8th Installment  असा स्टेटस दिसत आहे. PMkisan.gov.in वर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करून हे तपासू शकणार आहात. 

कसे चेक कराल?

PMkisan.gov.in वर लॉगिन करा...
तिथे 'Farmers Corner' मिळणार आहे. 
'Farmers Corner' मध्ये 'Beneficiary List' हा ऑप्शन मिळणार आहे. 
'Beneficiary List' च्या बटनावर क्लिक करा...
या पेजवर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक निवडा. यानंतर तुमचा गाव निवडा. 
यानंतर 'Get Report' वर क्लिक करा. यामध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येणार आहे. 
महत्वाचे म्हणजे ही लिस्ट आद्याक्षरानुसार असते. तसेच एकापेक्षा जास्त पानांची असते. 
 

PM Kisan वर Loan
पीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे (Atmanirbhar Bharat Yojana) हे लोन दिले जाते. सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे आदेश दिले होते. 

Web Title: Good news for farmers; PM Kisan Samman Nidhi 8th installment, 2000 rs will announced by Narendra Modi today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.