मतदानापूर्वीच भाजपासाठी आनंदाची बातमी; अरुणाचलमध्ये मुख्यमंत्र्यांसह ५ जण विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:41 PM2024-03-28T13:41:27+5:302024-03-28T13:42:19+5:30
Arunachal Pradesh Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणूकही होणार आहे. एकाचवेळी अरुणाचल प्रदेशात १९ एप्रिलला मतदान होईल. तत्पूर्वी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे
नवी दिल्ली - BJP 5 candidates elected unopposed ( Marathi News )अरुणाचल प्रदेशात मतदानापूर्वीच मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह भाजपाचे ५ उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. या उमेदवारांविरोधात कुणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अरुणाचल प्रदेशात येत्या १९ एप्रिलला विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी भाजपासाठी ही आनंदाची बातमी आली आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे मुक्तो विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजपाचे इतरही उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघातून बिनविरोध जिंकणार आहेत. अरुणाचल प्रदेशातील पापुम पारेसह अनेक जागांवर विरोधी पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे ५ जागांवर सत्ताधारी भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
सगालीहून एर रातू तेची बिनविरोध विजयी होत एक प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. त्याशिवाय निचले सुबनगिरी जिल्ह्यातील जीरोहून एर हेज अप्पा यांनाही कुणी विरोध केला नाही. ज्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. तालीहून जिक्के ताको, तलिहाहून न्यातो डुकोम, सगाली रातू तेची आणि रोईंग विधानसभा मतदारसंघातून मुच्चू मीठी बिनविरोध आले आहेत. विधानसभेच्या जागांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या ५ जागांवर भाजपा व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाने किंवा अपक्षाने अर्ज दाखल केला नाही.
Arunachal Pradesh leads in showing the mood of the nation. On the last day of the nomination filing for the Assembly election, BJP has secured 5 candidates elected unopposed led by CM @PemaKhanduBJP ji from 3-Mukto Assembly Constituency.
— Kiren Rijiju (मोदी का परिवार) (@KirenRijiju) March 27, 2024
15. Sagalee Assembly Constituency: Shri… pic.twitter.com/EMxMGgruqU
अरुणाचल प्रदेशात सध्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होत आहेत. त्यात ६० सदस्यीय विधानसभा आणि २ लोकसभा जागेवर १९ एप्रिलला मतदान होत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अरुणाचल प्रदेशातील २ जागांवर १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणूक प्रक्रियेत २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. अर्जाची पडताळणी गुरुवारी आणि ३० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. विधानसभेची मतमोजणी २ जून तर लोकसभा जागांची मतमोजणी ४ जूनला होणार आहे.