केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! पगारात होणार बंपर वाढ, वाचा सॅलरीचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 09:49 AM2023-05-31T09:49:47+5:302023-05-31T09:51:13+5:30

सरकार दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) चार टक्क्यांनी वाढवू शकते.

Good news for central employees! There will be a bumper increase in salary, May be hike in DA | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! पगारात होणार बंपर वाढ, वाचा सॅलरीचं गणित

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! पगारात होणार बंपर वाढ, वाचा सॅलरीचं गणित

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होण्याची चिन्हे आहेत. सरकार २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत डीएमध्ये वाढीसोबतच फिटमेंट फॅक्टरमध्येही फायदा करण्याची शक्यता आहे. जर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढीची घोषणा झाली तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारावर त्याचा परिणाम दिसून येईल. सध्या सरकारकडून यावर अधिकृत घोषणा झाली नाही परंतु त्यात वाढ होण्याची चर्चा सुरू आहे. सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर म्हणून २.५७ टक्के रक्कम मिळते.

किती असेल कमीत कमी पगार?
४२०० रुपये ग्रेड पेवर कर्मचाऱ्याला बेसिक सॅलरी १५,५०० रुपये मिळते. त्याप्रमाणे एकूण पगार १५,५००*२.५७ रुपये म्हणजेच ३९.८३५ रुपये असेल. सहामाहीत फिटमेंट फॅक्टरमध्ये १.८६ टक्के वाढीची शिफारस आहे. कर्मचाऱ्यांनी फिटमेंट फॅक्टर ३.६८ टक्के करावा अशी मागणी वारंवार केली. जर यात वाढ झाली तर सध्याचे किमान वेतन १८ हजाराहून वाढून २६ हजारांपर्यंत पोहचू शकते. 

दुसऱ्या सहामाहीसाठी DA वाढ
याशिवाय सरकार दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) चार टक्क्यांनी वाढवू शकते. सरकारने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डीए आणि डीआरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. आता पुन्हा चार टक्के वाढ झाल्यास डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होईल. सरकारने मार्च २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्यात आला आहे. यानंतर दोनदा डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पगार किती वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्के झाला तर त्यांच्या पगारातही वाढ होईल. समजा, केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये आहे. ४२ टक्क्याच्या हिशोबाने DA हा ७५६० रुपये होतो. दुसरीकडे, जर डीए दुसऱ्या सहामाहीत ४६ टक्क्यांपर्यंत वाढला तर तो ८२८० रुपये होईल. म्हणजेच पगारात दरमहा ७२० रुपयांची वाढ होणार आहे. सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या सहामाहीसाठी डीए वाढवण्यास मान्यता देते. मात्र यावेळी ऑगस्टमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या सहामाहीसाठी डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग आहे. महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते.

Web Title: Good news for central employees! There will be a bumper increase in salary, May be hike in DA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.