राजधानी दिल्लीत सर्वांना मोफत वीज मिळणार! केजरीवाल सरकारने आणली नवीन योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 07:01 PM2024-01-29T19:01:49+5:302024-01-29T19:02:55+5:30
Delhi Government Solar Policy: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली.
Delhi Government Solar Policy: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीकरांना मोठी भेट दिली आहे. केजरीवालांनी राजधानी दिल्लीत नवीन सौर ऊर्जा धोरण 2024 जारी केले आहे. या धोरणांतर्गत जे लोक त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवतील, त्यांना वीज बिल आकारले जाणार नाही.
#WATCH दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने कहा, "दिल्ली सरकार ने नई सौर ऊर्जा नीति, सौर नीति 2024 जारी की है। अब तक 2016 की नीति लागू थी, यह देश की सबसे प्रगतिशील नीति थी... दिल्ली में 200 यूनिट तक बिजली मुफ्त, 400 तक आधी यूनिट और उससे ऊपर का पूरा बिल वसूला जाता है। नई सोलर… pic.twitter.com/OABzcdLM2d
— ANI_HindiNews (@AHindinews) January 29, 2024
विशेष म्हणजे, याद्वारे ते दरमहा 700-900 रुपयेदेखील कमवू शकता. याबाबत केजरीवाल म्हणाले की, 'आतापर्यंत राजधानीत 2016 चे धोरण लागू होते. ते देशातील सर्वात प्रगतीशील धोरण होते. 200 युनिटपर्यंत वीज मोफत, 400 युनिटपर्यंत अर्धे बिल अन् त्याहून अधिक वापरावर पूर्ण बिल आकारले जाते. आता नवीन दिल्ली सौर धोरणांतर्गत पुढील 3 वर्षांत 500 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसवणे बंधनकारक असेल.' दिल्ली सौर धोरण मंत्रिमंडळाने मंजूर केले असून, येत्या 10 दिवसांत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.