शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा १२वा हप्ता या महिन्यात होऊ शकतो जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 04:04 PM2022-09-25T16:04:40+5:302022-09-25T16:09:07+5:30
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने पीएम-किसान योजनेअंतर्गत आधीच ११ वा हप्ता जारी केला आहे, या देशातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
NIA-ED Raid on PFI: केंद्रातील मोदी सरकार लवकरच PFIवर बंदी घालणार; NIA च्या हाती मोठे पुरावे
पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पंचायतींमध्ये पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत,त्यांना त्यांचे नाव यादीमध्ये आले आहे की नाही हे ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. याशिवाय या योजनेचा भाग असलेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश देखील पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या लाभार्थीची माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्ट पाठवतात.यामधूनही शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे.
अशी पाहा ऑनलाईन यादी
केंद्र सरकारने शेतऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना निधी दिला जातो. या निधीसाठी आपले नाव आहे की नाही हे आता ऑनलाईन पाहता येते. यासाठी काही स्टेप्स आहेत या आपण पाहूया.
अगोदर, pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर पहिल्या पेजवर तुम्हाला , शेतकरी कॉर्नर नावाचा स्वतंत्र विभाग मिळेल. शेतकरी कॉर्नर विभागात 'लाभार्थी स्थिती' नावाचा टॅब आहे. त्यावर क्लिक करा. आणि तुम्ही थेट https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या लिंकवर देखील जाऊ शकता.
पुढ तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लगाणार आहे. यानंतर डेटा मिळवा पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही लाभार्थीची स्थिती पाहू शकाल.