Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 05:01 PM2023-03-28T17:01:12+5:302023-03-28T17:01:35+5:30

Covid-19 च्या 'टेन्शन'मध्ये भारतीयांसाठी आली दिलासा देणारी बातमी!

Good News for Indians related to covid 19 cases as peak will come late but it it not dangerous says experts read in detail | Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त..."

Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त..."

googlenewsNext

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 11 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील एकूण 14 राज्यांमध्ये रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. काही आठवड्यांत, संसर्गाचे प्रमाण सुमारे चार पटीने वाढले आहे. दिल्लीतील दोन जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा दर १३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. कोविडमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही थोडे वाढले आहे. देशात दररोज पॉझिटिव्हीटी रेटही वाढत आहे. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे रूग्ण बरे होण्याचा दर अजूनही ९९ टक्क्यांच्या जवळ आहे. पण कोविडच्या प्रकरणांमध्ये दररोज होणारी वाढ चिंता वाढवत आहे. अशातच तज्ज्ञांनी दिलासादायक गोष्ट सांगितली आहे.

जाणकारांनी दिला दिलासा

कोविडच्या शेवटच्या तीन लाटांमध्येही, जेव्हा प्रकरणे वाढली, तेव्हा काही महिन्यांनंतर कोरोनाने उच्चांक गाठला होता. तिसर्‍या लाटेत उच्चांक (पीक) फार लवकर गाठला गेला नाही. त्या लाटेत ना हॉस्पिटलायझेशन झाले, ना मृत्यूच्या घटना वाढल्या. तज्ज्ञ सांगतात, "यावेळी वाढणारी प्रकरणे ही नवीन लाट मूळीच नाही. कोविडच्या प्रकरणांमध्ये असलेली छोटीशी उडी आहे, जी काही दिवसांनी कमी होईल." दिल्लीतील एमडी मेडिसिन आणि कोविड तज्ज्ञ डॉ. कवलजीत सिंग म्हणतात, "कोरोनाचे रुग्ण काही दिवस वाढतील. सध्या संसर्ग पसरत आहे. पुढील काही दिवस केसेस वाढतील. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्याच्या सुरूवातीस, प्रकरणे कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत केसेस नक्कीच वाढतील, पण त्यांचा वेग कमीच राहील. ज्यांना आधीच गंभीर आजार आहे किंवा जे वृद्ध रुग्ण आहेत त्यांनाच जास्त संसर्ग होईल. त्यांनी काळजी घ्यायला हवी."

डॉ. सिंग म्हणतात, "व्हायरसचा पॅटर्न तीन महिन्यांपूर्वी होता तसाच आहे. त्यानंतरही प्रकरणे तशीच वाढत होती. या वेळी इन्फ्लूएंझाच्या भीतीने लोक हॉस्पिटलमध्ये जात आहेत. यादरम्यान त्यांची कोविड चाचणीही केली जात आहे. त्यामुळे कोविडची आणखी प्रकरणे समोर येत आहेत."

घाबरण्याची गरज नाही!

AIIMS नवी दिल्ली येथील मेडिसिन विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांच्या मते, "कोरोनाची प्रकरणे वाढत असली तरी घाबरण्यासारखे काही नाही. देशात कोविड विरुद्ध पाळत ठेवणारी यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे जरी लोकांना कोविडला हलके न घेण्याचा आणि प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात असला तरी त्याचा परिणाम फार घातक नाही. पण असे असले तरी मास्क वापरण्याची खात्री करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा."

Web Title: Good News for Indians related to covid 19 cases as peak will come late but it it not dangerous says experts read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.