रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हजारो नॉन एसी डबे वाढवण्याची रेल्वेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 05:25 PM2024-07-05T17:25:59+5:302024-07-05T17:31:07+5:30

रेल्वे मंत्रालयाने २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये आणखी १०००० नॉन-एसी कोच तयार करण्याच्या तयारीत आहे. आपल्या रोलिंग स्टॉकची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी ५३०० हून अधिक सामान्य डबे सुरू करण्याची रेल्वेने नियोजन सुरू केले आहे.

Good news for railway passengers Railways preparing to increase thousands of non-AC coaches | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हजारो नॉन एसी डबे वाढवण्याची रेल्वेची तयारी

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हजारो नॉन एसी डबे वाढवण्याची रेल्वेची तयारी

भारतीय रेल्वे सामान्य नागरिकांना आनंदाची बातमी देणार आहे. मंत्रालयाने २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये आणखी १०,००० नॉन-एसी कोच बनवण्याचे नियोजन केले आहे, यामुळे सामान्य नागरीकांना सुविधा वाढणार आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४,४८५ नॉन-एसी कोच आणि २०२५-२६ मध्ये आणखी ५,४४४ डबे मिळणार आहेत.  याव्यतिरिक्त, रेल्वेने आपल्या रोलिंग स्टॉकची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी ५,३०० हून अधिक सामान्य डबे सुरू करण्याची योजना आखली आहे.

अमृतपाल सिंग यांनी घेतली खासदारकीची शपथ, विशेष विमानाने आणले दिल्लीत

अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात, भारतीय रेल्वे २,६०५ सामान्य डबे तयार करण्याची तयारी करत आहे, यामध्ये प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यासाठी डिझाइन केलेले विशेष अमृत भारत सामान्य डब्यांचा देखील समावेश होणार आहे. नॉन-एसी स्लीपर कोच आणि ३२३ एसएलआर कोच, यात अमृत भारत कोच, ३२ उच्च-क्षमतेच्या पार्सल व्हॅन आणि ५५ पॅन्ट्री कार देखील तयार केल्या जातील.

भारतीय रेल्वेने आपल्या ताफ्यात २,७१० सामान्य डब्यांची वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, यामध्ये नव्या फिचरवाल्या अमृत भारत सामान्य डब्यांचा समावेश सुरू आहे. या कालावधीसाठी उत्पादन लक्ष्यामध्ये अमृत भारत जनरल कोचसह १,९१० नॉन-एसी स्लीपर कोच आणि अमृत भारत स्लीपर कोचसह ५१४ एसएलआर कोचचा समावेश आहे.

पुणे ते हरंगुळ, कोल्हापूरसह तीन गाड्यांना मुदतवाढ

गर्दीचा हंगाम संपला तरी रेल्वेला प्रवाशांची गर्दी वारंवार वाढत आहे. त्यामुळे पुणे विभागातून हंगामी काळासाठी धावणाऱ्या पुणे-हरंगुळ, पुणे-कोल्हापूर आणि सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस या तीन गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना माेठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Good news for railway passengers Railways preparing to increase thousands of non-AC coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे