Ration Card : गुड न्यूज! 'या' रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू, 14 किलो तांदळासोबत मोफत मिळणार तेल, मीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 04:45 PM2022-11-19T16:45:35+5:302022-11-19T17:01:05+5:30
Ration Card : सरकारने रेशनकार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. मोफत रेशनसोबतच तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केलं आहे.
जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल आणि तुम्हाला देखील मोफत रेशन योजनेचा लाभ मिळत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कारण सरकारने रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. मोफत रेशनसोबतच तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केलं आहे. सरकारने अंत्योदय रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य रेशन कार्डधारकांना फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळेल. मात्र, यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे 2 रुपये आणि तांदळासाठी 3 रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे. सरकार देशभरातील रेशन कार्डधारकांना अनेक सुविधा देत असून ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.
कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत कोट्यवधी लोकांना सरकारने मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (Prime Minister Garib Kalyan Yojana) लोकांना त्याचा लाभ दिला जात आहे.
तेल आणि मीठ मिळेल मोफत
मीठ, तेल, हरभरा यांची पाकिटे शिल्लक असतील तर शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हा नियम पाळला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
लाखो कार्ड केली रद्द
सध्या देशभरातील 80 कोटींहून अधिक लोकांना गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र आतापर्यंत सरकारने सुमारे 10 लाख कार्डधारकांची कार्ड रद्द केली आहेत. रेशनकार्डच्या सुविधेचा लाभ अनेक अपात्र लोकही घेत आहेत, त्यामुळे सरकारने सर्व अपात्र लोकांची कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र कार्डधारकांचा डेटा डीलर्सना पाठवला जात आहे, जेणेकरून या लोकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून रेशन वसूल करता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"