सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:20 AM2024-06-12T11:20:41+5:302024-06-12T11:22:52+5:30

...यासंदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे.

Good news for the ration card holders after the formation of the government govt extended aadhar and ration card linking deadline till 30th september | सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय

जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख आणखी पुढे ढकलली आहे. यावेळी सरकारने तीन महिन्यांनी मुदत वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून होती. ती आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे.

आधार आणि रेशनकार्ड लिंक करणे का आहे आवश्यक? -
सरकारने 'वन नेशन-वन रेशन कार्ड'ची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवरही लाभ घेत आहेत. यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते. असे, सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.

यापूर्वीही अनेकवेळा देण्यात आलीय मुदतवाढ -
आधार आणि रेशन कार्ड लिंक करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महत्वाचे म्हणजे, रेशन कार्ड आधारला लिंक करण्याच्या अंतिम तारखेला सरकारने यापूर्वीही अनेक वेळा मुदत वाड दिली आहे. आता पुन्हा एकदा हिला मुदतवाढ देत 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर, गरजूंपर्यंत त्यांच्या वाट्याचे खाद्यान्न पोहोचणे सोपे होईल. ते सुरळितपणे पोहोचू शकेल.
 

Web Title: Good news for the ration card holders after the formation of the government govt extended aadhar and ration card linking deadline till 30th september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.