रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! वेटिंग तिकीट १२० नाही तर ६० दिवस आधी बुक करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:08 PM2024-10-17T14:08:32+5:302024-10-17T14:11:21+5:30
भारतीय रेल्वेने एक नोटीफीकेशन जारी केले आहे. यामध्ये १ नोव्हेंबरपासून एडव्हान्स रिझर्व्हेशनबाबत काही नियम बदलले आहेत.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एडव्हान्स रिझर्व्हेशनबाबत रेल्वेने नवीन नोटीफिकेशन जारी केले आहे.
भारतीय रेल्वेने वेटिंग तिकिटांबाबत नियम बदलले आहेत. आता १२० दिवसांऐवजी तुम्ही ६० दिवस अगोदर तिकीट बुक करू शकता. गुरुवारी १७ ऑक्टोबर २०२४ रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता एडव्हान्स रिझर्वेशनबाबत अंतिम मुदत कमी करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई! देशभरात छापे, पानिपतमधून शूटरला अटक
रेल्वेने या अधिसूचनेत म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२४ पासून, ट्रेनमधील एडव्हान्स रिझर्व्हेशनबाबतची सध्याची वेळ मर्यादा १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी केली जाईल. ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत १२० दिवसांच्या ARP अंतर्गत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील.
दिवसा ताज सारख्या धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असंही रेल्वेने म्हटले आहे. एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस इत्यादींमध्ये एडव्हान्स वेळ मर्यादा कमी आहे. याशिवाय विदेशी पर्यटकांसाठी ३६५ दिवसांच्या मर्यादेत कोणताही बदल होणार नाही.
तिकीट बुकिंग व्यवस्था सोपी व्हावी आणि प्रत्येकाला तिकीट मिळावे यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. बेकायदेशीरपणे तिकीट काढणाऱ्यांविरोधात रेल्वेकडूनही सातत्याने मोहीम राबवली जाते.