सरकारी नोकरदारांना खुशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:05 AM2021-05-06T02:05:56+5:302021-05-06T02:07:10+5:30
सातव्या आयोगाच्या वेतन निश्चितीची डेडलाइन वाढली
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची डेडलाइन तीन महिने पुढे ढकलली आहे. यापूर्वी १५ एप्रिलला वेतन निश्चिती होणार होती. आता १ जुलै २०२१ ला महागाई भत्ता पूर्ववत झाल्यानंतर वेतनवाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
महागाई भत्ता पुर्ववत झाल्यावर वेतनवाढीचा लाभ
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार यंत्रणेनुसार वेतनवाढ कोणत्या तारखेनुसार लागू करायची
आहे, याचा निर्णय घेता येणार आहे.
अनेकांना कोरोना काळात कामाच्या ताणामुळे पर्याय निवडता आला नव्हता.
मात्र, त्यांना आता ही संधी मिळाली आहे.
nकर्मचाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर निश्चित पदोन्नती मिळत होती.
nआता कामगिरीच्या आधारे पदोन्नती किंवा वेतनवाढ होणार आहे.
कर्मचाऱ्यांना ठरवता येईल तारीख
कामगार खात्याकडून वेतन निश्चितीबाबत नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
पदोन्नतीच्या तारखेपासून किंवा वेतनवाढीच्या तारखेनुसार वेतन निश्चितीचा पर्याय आहे.
पदोन्नतीच्या तारखेपासून वेतननिश्चिती निवडण्याचा पर्यायही कर्मचाऱ्यांना आहे.