खूशखबर! भारतीयांना व्हिसा तातडीने मिळणार; अमेरिका मैत्री निभावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 06:42 AM2022-12-07T06:42:29+5:302022-12-07T06:42:46+5:30

अमेरिकेच्या राजदूत एलिझाबेथ यांची माहिती, कोविड काळामुळे अमेरिका व्हिसाची प्रक्रिया थंडावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीयांना व्हिसाची प्रतीक्षा आहे.

Good news! Indians will get visas promptly; America will maintain friendship | खूशखबर! भारतीयांना व्हिसा तातडीने मिळणार; अमेरिका मैत्री निभावणार

खूशखबर! भारतीयांना व्हिसा तातडीने मिळणार; अमेरिका मैत्री निभावणार

googlenewsNext

मुंबई : भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा तसेच व्हिसा मिळण्याच्या प्रक्रियेतील विलंब कमी व्हावा याकरिता अमेरिका प्राधान्याने काम करत आहे. किंबहुना, व्हिसाच्या मुद्द्यावर भारत हा देश आमच्या जागतिक प्राधान्यक्रमातील एक असल्याची माहिती अमेरिकेच्या भारतातील राजदूत एलिझाबेथ जोन्स यांनी दिली. मंगळवारी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

कोविड काळामुळे अमेरिका व्हिसाची प्रक्रिया थंडावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीयांना व्हिसाची प्रतीक्षा आहे. यामध्ये विविध श्रेणीतील व्हिसा आहेत. व्हिसाचे काम आता सुरू झाले असले तरी अद्यापही प्रतीक्षा यादी आणि विलंब होत आहे. मात्र, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हिसा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच, व्हिसासाठी आवश्यक बॅक ऑफिस कामासाठी भारताबाहेरील अमेरिकी कर्मचाऱ्यांचीदेखील मदत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुढील वर्षी आतापर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक व्हिसा कर्मचारी संख्या भारतात असेल, असेही एलिझाबेथ जोन्स यांनी सांगितले. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत व जगातील सर्वात जुनी लोकशाही व्यवस्था असलेला अमेरिका देश हे आता एकमेकांचे नैसर्गिक भागीदार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग, विकासात्मक कामे आदी मुद्यांवर दोन्ही देश एकत्रितपणे काम करत असून याचा मोठा फायदा होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

उद्योजकांशी चर्चा  
मुंबई दौऱ्यावर असलेल्या एलिझाबेथ यांनी काही प्रमुख उद्योजकांशीदेखील चर्चा केली. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना कोणत्या क्षेत्रात एकत्र काम करण्याची संधी आहे, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज आहे याचा आढावा घेऊन त्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

Web Title: Good news! Indians will get visas promptly; America will maintain friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.