राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 03:17 PM2023-09-09T15:17:11+5:302023-09-09T15:18:17+5:30
महत्वाचे म्हणजे, राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाले आहे. तर, गर्भगृह यापूर्वीच तयार झाले आहे.
अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य अशा राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे. येणाऱ्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे समजते. या दिवशी राम ललांची गर्भगृहात प्रतिष्ठापनाही केली जाईल. अयोध्येत सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे उद्घाटन करतील. प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडा आधीपासूनच पूजेला सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाले आहे. तर, गर्भगृह यापूर्वीच तयार झाले आहे.
केव्हापर्यंत पूर्ण होईल राम मंदिर? -
राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्ण पणे तयार झाले आहे. तर, गर्भगृहाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. राम मंदिराचे काम सुरू असतानाचे अनेक फोटो अयोध्येतून समोर आले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे जनरल सेक्रेटरी चंपत राय हे अनेक वेळा बांधकामासंदर्भातील अपडेट आणि फोटो शेअर करत असतात.
उद्घाटनासाठी जगभरातून येणार लोक -
श्री रामजन्मभूमी मंदिरातील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त मोठ्या आतुरतेने या मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत आहेत. मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्राकडून देशभरातील धार्माचार्यांना आणि जगातील 160 देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.