खूशखबर; टपाल खात्याला पगारवाढीचं 'पत्र'; १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांचा खिसा खुळखुळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 03:39 PM2018-06-06T15:39:02+5:302018-06-06T15:51:45+5:30
टपाल खात्याच्या कर्मचा-यांना केंद्र सरकारनं भरघोस पगारवाढ दिली आहे.
नवी दिल्ली- टपाल खात्याच्या कर्मचा-यांना केंद्र सरकारनं भरघोस पगारवाढ दिली आहे. याचा पोस्टाच्या 1 लाख 40 हजार कर्मचा-यांना फायदा पोहोचणार असून, कर्मचा-यांची वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यांतील ग्रामीण डाक सेवक 22 मे पासून संपावर आहेत.
सरकारला ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्यांसंदर्भात जीडीएस कमिटीने 24 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. ग्रामीण डाक सेवकांची फक्त एकच मागणी आहे की कमलेश चंद्र कमिटीच्या सकारात्मक मागण्या मान्य कराव्यात. ग्रामीण डाक सेवक हे पोस्टाच्या विशाल नेटवर्कमुळे खेड्यापाड्यांत जातात. त्यामुळे सरकारनं त्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती.
150 वर्षांत डाक सेवकांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. ग्रामीण डाक सेवकांनी 1 जून रोजी महाराष्ट्र व गोवा तसेच संपूर्ण भारत देशभर मोर्चे काढण्यात आले व ठाणे जिल्ह्याचे खासदार कपिल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण डाक सेवकांनी धरणे आंदोलनं, निदर्शने केली होती.