खूशखबर : यावर्षी भारतात मान्सून उत्तम, दुष्काळाची शक्यता नाही, स्कायमेटचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 04:44 PM2019-02-25T16:44:21+5:302019-02-25T16:56:34+5:30

यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

Good news: Monsoon is good this year, SkyMate forecast | खूशखबर : यावर्षी भारतात मान्सून उत्तम, दुष्काळाची शक्यता नाही, स्कायमेटचा अंदाज 

खूशखबर : यावर्षी भारतात मान्सून उत्तम, दुष्काळाची शक्यता नाही, स्कायमेटचा अंदाज 

Next
ठळक मुद्देयावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही२०१९-२० साठीचा मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवताना स्कायमेटने यावर्षी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे

नवी दिल्ली - गेल्या वर्षी मान्सूनने ओढ दिल्लाने यंदाच्या राज्यासह देशात दुष्काळाचे सावट आहे. अनेक ठिकाणी पिण्याचा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मात्र यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. २०१९-२० साठीचा मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवताना स्कायमेटने यावर्षी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे. 

यावर्षी भारतात मान्सून सर्वसामान्य राहण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक आहे, असे स्कायमेटचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिरस जतीन सिंह यांनी म्हटले आहे. स्कायमेट ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी एकमेव खासगी संस्था आहे. दरम्यान, गेल्या ५० वर्षातील सरासरीचा विचार करता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल. दरम्यान, मान्सूनबाबतचा स्कायमेटचा सुधारित अंदाज एप्रिल महिन्यामध्ये जाहीर होणार आहे.  



 

Web Title: Good news: Monsoon is good this year, SkyMate forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.