खूशखबर ! आता थेट कुलू-शिमल्यापर्यंत विमानसेवा
By admin | Published: March 30, 2017 05:05 PM2017-03-30T17:05:42+5:302017-03-30T17:08:33+5:30
छोटया शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेचा गुरुवारी आराखडा जाहीर झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - छोटया शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेचा गुरुवारी आराखडा जाहीर झाला. या योजनेमध्ये कुलू आणि शिमला या पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच थेट दिल्लीहून कुलू आणि शिमल्यापर्यंत विमान सेवा सुरु होईल. ज्याचा लाखो पर्यटकांना फायदा होऊ शकतो.
दरवर्षी मुंबईसह महाराष्ट्रातून मोठया संख्येने पर्यटक कुलू-शिमला या थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात. सध्या कुलू-शिमला येथे थेट विमानाने जाता येत नाही. दिल्ली किंवा चंदीगडपर्यंत विमानाने गेल्यानंतर तिथून पुढे रस्तेमार्गाने कुलू-शिमल्यापर्यंतचा प्रवास करावा लागतो. या नव्या सुविधेमुळे पर्यटकांचा वेळ वाचणार आहे.
आणखी वाचा
दिल्लीहून शिमल्याला जाण्याठी नऊ तर चंदीगडहून पाच तास लागतात. रस्तेमार्गाचा प्रवास थकवून टाकणारा असतो. पर्यटकांचा उत्साह मावळतो. त्यामुळे दिल्ली ते कुलू, शिमला विमान सेवेचा पर्यटकांना फायदा होईल. नवविवाहीत जोडप्यांची हनिमूनसाठी कुलू-मनालीला पसंती असते.
हवाईसंपर्क नसलेल्या 128 शहरांना या योजनेव्दारे जोडले जाणार आहे. शिवाय परवडणा-या किंमतीत हवाई प्रवास शक्य होईल. एअर इंडिया, स्पाईस जेट, एअर डेक्कन, एअर ओडिशा आणि टरबो मेघा या पाच हवाई कंपन्या 128 मार्गांवर विमान सेवा सुरु करतील. या योजनेत महाराष्ट्रतील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. तासाभराच्या प्रवासासाठी 2500 रुपये आकारण्यात येतील.