Good News - आता घरपोच मिळणार रेल्वे तिकीट

By admin | Published: May 10, 2017 10:46 AM2017-05-10T10:46:20+5:302017-05-10T11:05:44+5:30

नागरीकांचा रेल्वे प्रवास जास्तीत जास्त सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने ग्राहकसेवेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

Good News - Now the home ticket will get the Railway Ticket | Good News - आता घरपोच मिळणार रेल्वे तिकीट

Good News - आता घरपोच मिळणार रेल्वे तिकीट

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 10 - नागरीकांचा रेल्वे प्रवास जास्तीत जास्त सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने ग्राहकसेवेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. रेल्वेने आता घरपोच तिकीटांची सुविधा सुरु केली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना घरबसल्या तिकीट मिळू शकते.
 
आयआरसीटीसीने घरपोच तिकीटांची व्यवस्था सुरु केली असून, नागरीक रोकड किंवा अन्य मार्गाने तिकीटांचे पेमेंट करु शकतात. भारतीय रेल्वेच्या कॅटरींग आणि टूरीजम कॉर्पोरेशनने ग्राहक सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरु केली आहे. ज्यामध्ये ग्राहक तिकीट हाती पडल्यानंतरच पेमेंट करु शकतात. ऑनलाइन बुक केलेले तिकीट हातात आल्यानंतरच ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. 
 
आयआरसीटीसीने आपली वेबसाईट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून पे ऑन डिलिवरीची सुविधा सुरु केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. भारतीय रेल्वेने सध्या डिजिटलायझेशनवर भर दिला असून, ऑनलाइन व्यवस्थांच्या माध्यमातून नागरीकांचा त्रास शक्य तितका कमी करण्यावर भर दिला आहे. महसूल वाढवण्यासाठी विविध पर्यायांवर अंमलबजावणी करताना ग्राहकसेवांनाही तितकेच प्राधान्य दिले आहे. 
 

Web Title: Good News - Now the home ticket will get the Railway Ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.