खुशखबर! आता Whatsapp ने करता येणार पेमेंट
By admin | Published: April 4, 2017 04:40 PM2017-04-04T16:40:20+5:302017-04-04T16:53:43+5:30
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप भारतात पेमेंट सर्विस सुरू करणार
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - आतापर्यंत तुम्ही पैशांचा व्यवहार करण्यासाठी पेटीएम, भीम किंवा मोबिक्विक यांसारख्या अॅपचा वापर करत आहात, पण लवकरच तुम्हाला या सर्व अॅपपासून सुटका मिळणार आहे. कारण लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप भारतात पेमेंट सर्विस सुरू करणार असल्याचं वृत्त आहे.
the-ken.com ने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार व्हॉट्सअॅपचे भारतात जवळपास 20 कोटी युजर्स आहेत. म्हणजे व्हॉट्सअॅपसाठी भारत जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुढील 6 महिन्यात व्हॉट्सअॅप भारतात ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा सुरु करणार आहे. UPI द्वारे व्हॉट्सअॅप पेमेंट सर्विस सुरू करण्याची योजना आखत आहे. डिजिटल इंडियाला हातभार लावण्यासाठी तत्पर काही कंपन्यांसोबत काम करण्यास व्हॉट्सअॅप उत्सुक आहे.
फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सअॅपचे को-फाउंडर ब्रायन ऐक्टन यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली होती. त्यावेळी डिजीटल पेमेंट सर्विसबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती. तेव्हा, आम्ही अजून कमर्शियल मेसेंजिंगमध्ये प्रवेश केलेला नाही पण याबाबत विचार करत आहोत असं ब्रायन ऐक्टन म्हणाले होते.
यापुर्वी स्विडेनची कंपनी Truecaller नेही भारतात पेमेंट सर्विस लॉन्च केली आहे. यासाठी Truecaller ने आयसीआयसीआयसोबत भागीदारी केली आहे.
त्यामुळे आता लवकरच व्हॉट्सअॅपवरून चॅट आणि कॉलिंगशिवाय पेमेंट करण्याची सुविधाही मिळणार आहे.