खूशखबर ! केंद्र सरकारकडून लवकरच 2.8 लाख कर्मचा-यांची भरती
By admin | Published: March 2, 2017 10:09 AM2017-03-02T10:09:44+5:302017-03-02T10:15:54+5:30
केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 2 लाख 80 हजार कर्मचा-यांची भरती करणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 2 लाख 80 हजार कर्मचा-यांची भरती करणार आहे. यापैकी 1लाख 80 हजार कर्मचारी पोलीस आणि आयकर विभागात मेगा भरती केले जाणार आहेत.
मार्च 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार केंद्राकडे असणा-या विविध 55 खात्यांमध्ये आणि मंत्रालयामध्ये 32 लाख 84 हजार कर्मचारी आहेत.
यामध्ये रेल्वेच्या 13 लाख 31 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लष्करातील मनुष्यबळाचा यात समावेश नाही. त्यामुळे प्रस्तावित भरती केल्यास एकूण कर्मचाऱ्यांची संख्या मार्च 2018 पर्यंत 35 लाख 67 हजार एवढी होईल. आयकर खात्याचे मनुष्यबळ सध्या 46 हजार एवढे असून ते मार्च 2018 पर्यंत 80 हजार केलं जाईल. तर सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला मार्च 2018 पर्यंत अतिरिक्त 41 हजार एवढे कर्मचा-यांची भरती केली जाईल.
दिल्ली पोलीस आणि पॅरामिलिटरीचे मनुष्यबळ 10 कोटी 7 लाखांवरुन मार्च 2018 पर्यंत 11 लाख 13 हजार एवढे करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. दरम्यान रेल्वे खात्यात मात्र कर्मचारी भरतीबाबत सध्या कोणतीही तरतूद नसल्याची माहिती समोर येत आहे.