दिलासादायक बातमी, दिल्लीत दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रभाव संपतोय
By महेश गलांडे | Published: September 24, 2020 01:53 PM2020-09-24T13:53:22+5:302020-09-24T13:53:56+5:30
देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही, गेल्या 24 तासांत देशात 86,508 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 57,32,518 एवढी झाली आहे
नवी दिल्ली - दिल्लीतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. राजधानी दिल्लीतील कोरोनाची दुसऱ्या टप्प्यातील लाटही आता संपुष्टात येत आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांच्या मतानुसार, दिल्लीत 15 ऑगस्टपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती, ती आता 16 सप्टेंबरपर्यंत संपुष्टात आली आहे. त्यामुळेच, आता दिल्लीतील नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही, गेल्या 24 तासांत देशात 86,508 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 57,32,518 एवढी झाली आहे. तर, 91,149 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून गेल्या 24 तासांत 1129 नवीन मृत्यू झाले आहेत. सध्या देशात 9,66,382 रुग्णांवर उपचार सुरु असून 46,74,987 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 81.55 टक्के असून मृत्यूदर 1.59 टक्के आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल असून राज्यातआत्तापर्यंत तब्बल 12,63,799 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी, 33,886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशातील कोरोनाबाधित राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
इंडियन कॉन्सील मेडिकल रिसर्च संस्थेच्या आकडेवाडीनुसार भारताने बुधवारी 11,56,569 चाचण्यां घेतल्या आहेत. त्यानुसार, आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या, 6 कोटी 74 लाख 36 हजार 31 एवढी आहे.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ICU मध्ये
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना बुधवारी लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाइन होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम आदमी पार्टीचे 48 वर्षीय नेते मनीष सिसोदिया यांच्या शरीरातून ऑक्सिजनचा स्तर कमी झाला झाल्यामुळे आणि ताप असल्याने बुधवारी सायंकाळी साधारण चार वाजता त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.