पुन्हा एकदा ISRO चा धमाका, Aditya-L1 नं पाठवली गुड न्यूज; संपूर्ण जग अवाक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 22:39 IST2023-09-30T22:38:46+5:302023-09-30T22:39:41+5:30
चंद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबरला इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी मिशन आदित्य एल-1 अंतराळ यान लॉन्च केले होते. आता याच सौर मिशनसंदर्भात इस्रोने गुड न्यूज दिली आहे.

पुन्हा एकदा ISRO चा धमाका, Aditya-L1 नं पाठवली गुड न्यूज; संपूर्ण जग अवाक!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO एका पाठोपाठ एक, अशा वेगवेगळ्या ग्रहांवर आपल्या यशाचा बिगूल वाजवताना दिसत आहे. चंद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबरला इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी मिशन आदित्य एल-1 अंतराळ यान लॉन्च केले होते. आता याच सौर मिशनसंदर्भात इस्रोने गुड न्यूज दिली आहे.
इस्रोनं इतिहास रचला -
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य L1 ने पृथ्वीपासून 9.2 लाख किलोमीटरहून अधिकचे अंतर कापले आहे. पृथ्वीचा प्रभाव असलेले क्षेत्र यशस्वीपणे पार करत त्याने हे अंतर कापले आहे. आता ते सूर्य-पृथ्वी Lagrange point 1 (L-1) च्या दिशेने आपल्या मार्गावर आहे. महत्वाचे म्हणजे, सलग दुसऱ्यांदा पृथ्वीच्या प्रभावाखालील क्षेत्राबाहेर अंतराळ यान पाठविण्यात इस्रोला यश आले आहे.
Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) September 30, 2023
🔸The spacecraft has travelled beyond a distance of 9.2 lakh kilometres from Earth, successfully escaping the sphere of Earth's influence. It is now navigating its path towards the Sun-Earth Lagrange Point 1 (L1).
🔸This is the second time in succession that…
असं आहे मिशन -
इस्रोने देशाच्या पहिल्या सूर्य मिशनअंतर्गत ‘आदित्य L1’ यान आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रावरून पोलर सॅटॅलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV)-C57 च्या माध्यमाने दोन सप्टेंबरला यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते. ‘आदित्य L1’ने 7 पेलोड्स वाहून नेले आहेत, यांपैकी 4 सूर्यप्रकाशाचे निरीक्षण करतील आणि उर्वरित तीन प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचे इन-सीटू पॅरामीटर्स मोजतील.