प्रवाशांसाठी खूशखबर; ट्रेनला १ तास उशीर झाल्यास १०० रुपये देणार IRCTC
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:38 PM2019-10-01T17:38:48+5:302019-10-01T19:26:48+5:30
ट्रेनला तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये मिळणार आहे. तसेच दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये प्रवाशांना भरपाई म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे.
नवी दिल्ली: दिल्ली- लखनऊ दरम्यान चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेच्या सहाय्यक कंपनी आयआरसीटीसीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये तेजस एक्सप्रेस ट्रेनला उशिर झाल्यास आयआरसीटीसी प्रवाशांना भरपाई देणार आहे.
आयआरसीटीसीने सांगितले की, तेजस ट्रेनला तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये मिळणार आहे. तसेच दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये प्रवाशांना भरपाई म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. तेजस ट्रेनमध्ये पुरेसे प्रवासी प्रवास करत नसल्याने आयआरसीटीसीने प्रवाशांना आर्कषित करण्यासाठी हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.
Compensation for Delay: In a first of its own, IRCTC to compensate passengers of the New Lucknow-Delhi Tejas Express in case of delay in the train schedule:
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 1, 2019
- ₹100 in case of a delay of more than an hour
- ₹250 in cases of a delay exceeding 2 hours
दिल्ली-लखनऊ दरम्यान 4 आँक्टोबरपासून तेजस एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. तसेच ही ट्रेन दिल्लीहून सायंकाळी 3 वाजून 35 मिनिटांनी रवाना होईल व लखनऊला त्याच दिवशी रात्री 10 वाजून 5 मिनिटाला पोहचणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ट्रेन धावणार आहे.
तेजस एक्स्प्रेस ही खासगी कंपनीची चालणारी पहिली ट्रेन आहे. तसेच भारतीय रेल्वे इतर मार्गांवरही तेजसला चालविण्याचा विचार करत आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आयआरसीटीसीच्या ह्द्दीत आहे. तसेच विमानात जशी सेवा देण्यात येते त्याचप्रमाणे तेजसमध्ये देखील सेवा देण्यात येते. तसेच वाय-फाय आणि मोबाइल चार्जिंगची सुविधा देखील ट्रेनमध्ये देण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेची दखल घेऊन प्रत्येक बोगीमध्ये 6 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.