खुशखबर ! ट्रायनं केबल ऑपरेटर्संना फटकारलं, 130 रुपयांतच मिळणार 100 चॅनेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 02:53 PM2018-11-20T14:53:03+5:302018-11-20T14:54:27+5:30
भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने केबल ऑपरेटर्स आणि डिटीएच सेवा देणाऱ्यांना फटकारलं
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने केबल ऑपरेटर्स आणि डायरेक्ट टू होम (DTH) सेवा देणाऱ्यांना फटकारलं आहे. तसेच केबल ऑपरेटर्स आणि सर्व्हीस प्रोव्हायडर्संसाठी नवीन आराखडा तयार केला आहे. या नवीन फ्रेमवर्कनुसार यापुढे ग्राहक जेवढे चॅनेल्स पाहतील, तेवढ्याच चॅनेल्सचे पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. केबल ऑपरेटर्स बळजबरीने अधिकचे चॅनेल्स ग्राहकांवर थोपवू शकणार नाहीत.
केबल ऑपरेटर्स किंवा डीटीएच सर्व्हीस प्रोव्हायडर्सं ट्रायने आदेश दिले आहेत. त्यानुसार, केबल ऑपरेटर्संना 130 रुपये प्रतिमहिना दराने 100 फ्री टू एअर चॅनेल्स दाखवणे बंधनकारक असणार आहे. 29 डिसेंबरपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. डीटीएच आणि केबल ऑपरेटर्संना हा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, या 100 चॅनेल्स व्यतिरिक्त इतर अन्य प्रिमियम किंवा पेड चॅनेल्स पाहायचे असतील, तर ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स युजर गाडईमध्ये प्रत्येक चॅनेल्सची एमआरपी म्हणजेच मॅक्सिमम रिटेल प्राईज ठरविण्यात येणार आहे. तसेच या रकमेपेक्षा अधिकची रक्कम केबल ऑपरेटर्संने घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ट्रायने नमूद केलं आहे. दरम्यान, केबल चॅनेल्सच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केबल ऑपरेटर्स आणि सर्व्हीस प्रोव्हायडर कंपन्यांकडून होत होते.
Discussion with Stakeholders during the Interactive Session on "New Regulatory Framework for Broadcasting & Cable Services, 2017", organised by TRAI @TRAI at SCOPE Complex, Lodhi Road, New Delhi pic.twitter.com/po2ieOb8pi
— TRAI (@TRAI) November 19, 2018