खूशखबर ! महिलांना लवकरच मिळणार फ्री हेल्थ चेकअप आणि टॅक्समध्ये सवलत

By admin | Published: May 7, 2017 03:45 PM2017-05-07T15:45:36+5:302017-05-07T15:45:36+5:30

केंद्र सरकारनं महिलांना फ्री हेल्थ चेकअप, कॅशलेस मेडिकल सर्व्हिस आणि टॅक्समध्ये सवलत देण्याची योजना आणली आहे

Good news! Women will get free health checkup and tax rebate soon | खूशखबर ! महिलांना लवकरच मिळणार फ्री हेल्थ चेकअप आणि टॅक्समध्ये सवलत

खूशखबर ! महिलांना लवकरच मिळणार फ्री हेल्थ चेकअप आणि टॅक्समध्ये सवलत

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - केंद्र सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. देशात गरिबी मोठ्या प्रमाणात असतानाच दुसरीकडे महिलांसोबतही दुजाभाव करण्यासारख्या घटना वारंवार समोर आल्यात. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महिलांना फ्री हेल्थ चेकअप, कॅशलेस मेडिकल सर्व्हिस आणि टॅक्समध्ये सवलत देण्याची योजना आणली आहे. या योजनेंतर्गत महिलांना टॅक्समधील सवलतीसह फ्री हेल्थ चेकअप करून दिलं जाणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एकट्या राहणा-या महिलांसाठी मोदी सरकार एक टॅक्स पॉलिसी आणणार आहे. या पॉलिसींतर्गत महिलांना टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. इतकेच नव्हे तर महिलांना आधारशी जोडलेले हेल्थ कार्डही देण्यात येणार आहे. त्या हेल्थ कार्डच्या मदतीनं महिला चेकअप करू शकतील. तसेच गर्भवती महिला कॅशलेस मेडिकल सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतील.

सूत्रांच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक टीम या सर्व योजनांवर काम करत आहे. लवकरच या योजनेची घोषणा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत महिलांना स्वच्छ जेवण आणि सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवून देण्याचंही विचाराधीन आहे. तसेच स्त्री-पुरुषमधील भेदभावादरम्यान महिलांना मोफत चिकित्सा आणि कायद्याचं संरक्षण, सल्ला, आश्रय देण्याचाही विचार आहे.

Web Title: Good news! Women will get free health checkup and tax rebate soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.