खुशखबर... आता लडाखला तुम्ही जाऊ शकता दिल्लीहून थेट बसने !
By admin | Published: June 7, 2016 05:51 PM2016-06-07T17:51:35+5:302016-06-07T18:04:30+5:30
भारतातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे लडाख. तसेच, जगातील सर्वात उंच ठिकाण म्हणून ओळखल्या जाणा-या लडाखला भेट देण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - भारतातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे लडाख. तसेच, जगातील सर्वात उंच ठिकाण म्हणून ओळखल्या जाणा-या लडाखला भेट देण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी हिमाचलच्या रस्ते परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा दिल्ली ते लेह अशी बस चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली ते लेह दरम्यान १,०५० किमीचे अंतर असून बसने नॉन-स्टॉप ३३ तासांचा कालावधी लागणार आहे. तसेच, यासाठी एका प्रवाशाला १,३६५ रुपये मोजावे लागणार आहेत. लेहला जाण्यासाठी तयार करण्यात आलेला चार पर्वतांच्या महामार्गावरुनचा हा प्रवास आहे. या ठिकाणी अतीव हिमवृष्टी झाल्यास वाहनांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रवास करणे अशक्य होते. विशेषत: ऑक्टोबरमध्ये आणि मे, जूनच्या दरम्यान हा अडथळा निर्माण होतो.
अशा, परिस्थितीत जर लडाखला जाणे मध्येच थांबविले, तर येथून जवऴच असलेल्या पॉप्युलर हिल टाऊन असलेल्या मनालीमध्ये आपल्याला काही दिवस घालवता येतील. त्यानंतर तेथून पुन्हा लेहला जाता येईल. तसेच, येत्या १ जुलैपासून मनाली ते लेह अशी बस सेवा ही हिमाचलच्या रस्ते परिवहन महामंडळ सुरु करणार आहे.