राजकारणात चांगले लोक यायला हवेत - जावडेकर

By admin | Published: May 18, 2017 04:16 AM2017-05-18T04:16:57+5:302017-05-18T04:16:57+5:30

व्यवस्थेचे संचालन करण्यासाठी लोकसंपर्क असलेले चांगले लोक राजकारणात आले नाहीत तर जनतेला राजकारणाबद्दल वाटणाऱ्या भीतीची पोकळी कधीच भरून

Good people want to come to politics - Javadekar | राजकारणात चांगले लोक यायला हवेत - जावडेकर

राजकारणात चांगले लोक यायला हवेत - जावडेकर

Next

- सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : व्यवस्थेचे संचालन करण्यासाठी लोकसंपर्क असलेले चांगले लोक राजकारणात आले नाहीत तर जनतेला राजकारणाबद्दल वाटणाऱ्या भीतीची पोकळी कधीच भरून निघणार नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने जो पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केला आहे, तो उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
दिल्लीच्या कॉन्स्टिटयुशन क्लब आॅफ इंडियाच्या सभागृहात, म्हाळगी प्रबोधिनीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केलेल्या ‘नेतृत्व, राजकारण व शासन व्यवस्था’ या विषयांशी निगडीत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास विशेष अतिथी या नात्याने व्यासपीठावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी, पी. मुरलीधर राव आदी उपस्थित होते. म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी प्रास्ताविक केले.
उद्घाटन सोहळ्यात बोलतांना माजी निवडणूक आयुक्त कुरेशी म्हणाले, भारतीय लोकशाही केवळ जगातली सर्वात मोठी लोकशाही नव्हे तर जगातल्या ९0 देशांच्या एकुण मतदारांची बेरीज केली तरी त्यापेक्षा भारतीय लोकशाहीचा आकार मोठा आहे. इतक्या अवाढव्य व्यवस्थेचे संचालन आदर्श पध्दतीने व्हावे यासाठी सरकार चालवणारे मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, त्यांचे लहान मोठे नेते या सर्वांनाच खास प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

४० विद्यार्थ्यांना प्रवेश, १७ पासून अर्ज स्वीकृती
म्हाळगी प्रबोधिनी १९८२ पासून मुंबईत कार्यरत आहे. आदर्श समाजसेवक व लोकप्रतिनिधी तयार करणे हा संस्थेचा उद्देश आहे. संस्थेने यंदाच्या वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन लिडरशिप पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रारंभ केला असून पहिल्या वर्षात ४0 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी १७ मे ते २0 जून दरम्यान प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.

Web Title: Good people want to come to politics - Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.