भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडून युती तोडताच या पक्षाला पडलं मोठं 'खिंडार'; बंडाचा आवाज 2024 मध्ये घुमणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:27 PM2023-12-28T12:27:48+5:302023-12-28T12:30:08+5:30

खरे तर, राज्यातील भाजपचे नेतृत्व आपल्या नेत्यांना बदनाम करत आहे, असे म्हणत या पक्षाने भाजपसोबतची युती तोडली होती.

Good sign for BJP As soon as the alliance was broken, aiadmk faced a big rebellion internal politics good news for bjp tamil nadu loksabha chunav | भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडून युती तोडताच या पक्षाला पडलं मोठं 'खिंडार'; बंडाचा आवाज 2024 मध्ये घुमणार!

भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडून युती तोडताच या पक्षाला पडलं मोठं 'खिंडार'; बंडाचा आवाज 2024 मध्ये घुमणार!

आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी दक्षिण भारतातील जागांवर लक्ष केंद्रित करत असलेल्या भाजपासाठी एक शुभ संकेत आहे. सप्टेंबर महिन्यात एनडीएसोबतचे संबंध तोडणाऱ्या आणि तामिळनाडूतील एक मोठा पक्ष असलेल्या AIADMK मध्ये बंड झाले आहे. खरे तर, राज्यातील भाजपचे नेतृत्व आपल्या नेत्यांना बदनाम करत आहे, असे म्हणत या पक्षाने भाजपसोबतची युती तोडली होती.

आता एआयएडीएमकेचे महासचिव पलानीस्वामी आणि पक्षातून हकालपट्टी केलेले नेते ओ. पन्नीरसेल्वम यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर स्वतःला पक्ष समन्वयक म्हणणारे माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी पुढील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद वाढविण्याचे संकेत दिले आहेत. 

पन्नीरसेल्वम म्हणाले, आम्ही AIADMK चे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी यांचे क्रौर्य रोखण्यासाठी हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ते म्हणाले, पलानीस्वामी यांनी AIADMK च्या नियमांचे उल्लंघन केले आहे आणि माजी मुख्यमंत्री तथा पक्षाच्या नेत्या एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिलेल्या अधिकारांचे पालन केले नाही.

पन्नीरसेल्वम पुढे म्हणाले, कारागृहात कोण जाणार हे काळच ठरवेल. पन्नीरसेल्वम यांचे म्हणणे आहे की, दिवंगत माजजी मुख्यमंत्री जयललिता यांना पक्षाचे स्थायी सरचिटणीस करण्यात आले होते. तो नियम तोडून कुणालाही ती पोस्ट हडपण्याचा अधिकार नाही. खरे तर, हा पक्षांतर्गत वाद 19 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठीही येणार आहे.

मोदी सरकारचं मुक्त कौतुक -
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत भारताला एक महान आणि आघाडीचा देश बनवले आहे. असेच सुशासन चालू राहावे यासाठी आम्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकेल आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा आयडियावर काम करत आहोत. 

Web Title: Good sign for BJP As soon as the alliance was broken, aiadmk faced a big rebellion internal politics good news for bjp tamil nadu loksabha chunav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.