दुकानदारांना अर्ध्या किंमतीत विकल्या जातात BSF जवानांच्या वस्तू
By admin | Published: January 11, 2017 08:00 AM2017-01-11T08:00:18+5:302017-01-11T11:48:07+5:30
दोन दिवसांपूर्वी बीएसएफ जवान तेज बहादूर यादवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून त्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांना किती निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11 - दोन दिवसांपूर्वी बीएसएफ जवान तेज बहादूर यादवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून त्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांना किती निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते. वरिष्ठ अधिकारी जवानांसाठी येणा-या वस्तू परस्पर बाहेर विकून मोकळे होतात असे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले आहे.
बीएसएफचे अधिकारी इंधन आणि अन्य अन्न-पदार्थांच्या वस्तू अर्ध्या किंमतीत बाहेर दुकानदारांना विकतात अशी माहिती बीएसएफच्या तळाजवळ राहणा-या नागरीकांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार श्रीनगर विमानतळाजवळ बीएसएफचे मुख्यालय आहे. तिथल्या दुकानदारांना बीएसएफचे अधिकारी कमी किंमतीत पेट्रोल, डिझेल आणि अन्न पदार्थांच्या वस्तू विकतात अशी माहिती एका जवानाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
बीएसएफच्या तळाजवळ राहणारे नागरीक डाळ, भाज्या अत्यंत स्वस्तात बीएसएफकडून विकत घेतात. रोजच्या वापराच्या वस्तूही आम्हाला नाकारल्या जातात आणि त्याच वस्तू बाहेर एजंटला विकल्या जातात अशी माहिती एका बीएसएफ जवानाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
तेज बहादूर यादवचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीएसएफने त्याच्यावर उलटा बेशिस्तीचा ठपका ठेऊन मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत असून, बीएसएफच्या डीआयजींनी चौकशी सुरु केली आहे.