Engineer’s Day : भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला गुगलकडून अनोखा सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:13 AM2018-09-15T11:13:45+5:302018-09-15T11:23:49+5:30

गुगलनेही खास दिवसाचं औचित्य साधत भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त एक खास डूडल तयार केले आहे

google doodle on indian famous and iconic engineer m visvesvaraya on the occasion of engineering day | Engineer’s Day : भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला गुगलकडून अनोखा सलाम!

Engineer’s Day : भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला गुगलकडून अनोखा सलाम!

googlenewsNext

नवी दिल्ली - गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत असतं. आज इंजिनिअर्स डे असल्याने जगभरात तो उत्साहात साजरा केला जात आहे. गुगलनेही या खास दिवसाचं औचित्य साधत भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त एक खास डूडल तयार केले आहे. त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाला या डुडलच्या माध्यमातून सलाम करण्यात आला आहे. 

डॉ. विश्वेश्वरय्या यांचं पूर्ण नाव डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या असं आहे. 15 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून साजरा होतो. दक्षिण भारतातील मैसूर, कर्नाटकला विकसित आणि समृद्धशाली क्षेत्र बनवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. गुगलने साकारलेल्या डूडलमध्ये विश्वेश्वरय्या यांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. तसेच एक पूल दिसत असून, त्यावर गुगल ही अक्षरं स्पष्टपणे दिसत आहेत. अतिशय कलात्मकपणे हे डूडल गुगलने तयार करण्यात आलं आहे.

Web Title: google doodle on indian famous and iconic engineer m visvesvaraya on the occasion of engineering day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.