गूगल मॅपवरही देशाचं नाव बदललं; सर्च केल्यानंतर तिरंग्यासह दिसत आहे 'भारत'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 10:15 AM2023-10-30T10:15:14+5:302023-10-30T10:25:05+5:30

गूगल मॅपवर सर्च बॉक्समध्ये भारत टाइप केले असता, 'दक्षिण आशियातील एक देश' असे लिहिलेले आणि त्या सोबतच तिरंगा ध्वजही दिसेल.

google maps shows bharat with indian flag After searching Bharat and says country in south asia | गूगल मॅपवरही देशाचं नाव बदललं; सर्च केल्यानंतर तिरंग्यासह दिसत आहे 'भारत'!

गूगल मॅपवरही देशाचं नाव बदललं; सर्च केल्यानंतर तिरंग्यासह दिसत आहे 'भारत'!

केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी देशाचे इंग्रजी नाव 'इंडिया' बदलून 'भारत' करण्याचे संकेत दिले होते. यावरून राजकारणही झाले. मात्र, अद्याप अधिकृतपणे हा बदल करण्यात आलेला नाही. पण, गूगल मॅपने हे नवे नाव नक्कीच स्वीकारले आहे. खरे तर, गूगल मॅपवर सर्च बॉक्समध्ये भारत टाइप केले असता, 'दक्षिण आशियातील एक देश' असे लिहिलेले आणि त्या सोबतच तिरंगा ध्वजही दिसेल.

गूगल मॅपने इंडिया आणि भारत या दोन्ही नावांना 'दक्षिण आशियातील एक देश' म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे भारताचा अधिकृत नकाशा गूगल मॅपवर बघायचा असेल तर, आपण इंग्रेजी अथवा हिंदी भाषेत गूगल मॅपवर भारत अथवा इंडिया लिहून नकाशा पाहू शकता.

कशी काम करते सिस्टिम? -
आपण गूगल मॅपच्या हिंदी व्हर्जनवर भारत टाइप केल्यास, आपल्याला भारताच्या नकाशासह 'भारत' बोल्ड अक्षरात लिहिलेले दिसेल. तसेच, आपण गूगल मॅपच्या इंग्रेजी वर्जनमध्ये जाऊन Bharat लिहिले, तर आपल्याला सर्च रिझल्टमध्ये देशाच्या नकाशासह India लिहिलेले दिसेल. अर्थात गूगल मॅप भारताला इंडिया म्हणूनही स्वीकार करते. सरकार नाव बदलण्याच्या तयारीत असताना गूगलने आधीच आपला होमवर्क सुरू केला आहे. 

गूगलने अधिकृत भाष्य केलेले नाही -
महत्वाचे म्हणजे, केवळ गूगल मॅपच नाही, तर गुगलच्या इतर प्लॅटफॉर्मवरही भारत आणि इंडिया लिहिल्यास, सेम रिझल्ट येत आहे. अर्थात यूजर्सनी गूगल सर्च, गूगल ट्रान्सलेटर, गूगल न्यूज सारख्या अॅप्सवर जाऊन भारत अथवा इंडिया लिहिल्यास, त्यांना सेम रिझल्ट मिळत आहे. मात्र, आतापर्यंत गूगलकडून यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

Web Title: google maps shows bharat with indian flag After searching Bharat and says country in south asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.