आणखी सात भाषांत अनुवाद करणार गुगल ट्रान्सलेट अ‍ॅप, आॅफलाइनही चालणार, मराठी, तामिळ, बंगाली, उर्दूचाही समावेश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:37 AM2017-09-16T01:37:56+5:302017-09-16T01:38:27+5:30

सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अ‍ॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये आता मराठी, बंगाली व उर्दूसह सात आणखी भाषा असतील.

The Google Translate app will also be translated into more than seven languages, including offline, Marathi, Tamil, Bengali and Urdu. | आणखी सात भाषांत अनुवाद करणार गुगल ट्रान्सलेट अ‍ॅप, आॅफलाइनही चालणार, मराठी, तामिळ, बंगाली, उर्दूचाही समावेश  

आणखी सात भाषांत अनुवाद करणार गुगल ट्रान्सलेट अ‍ॅप, आॅफलाइनही चालणार, मराठी, तामिळ, बंगाली, उर्दूचाही समावेश  

googlenewsNext

नवी दिल्ली : सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अ‍ॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये आता मराठी, बंगाली व उर्दूसह सात आणखी भाषा असतील.
ज्या भारतीय भाषांसाठी गुगल ट्रान्सलेट अ‍ॅपची सेवा सुरू केली आहे, त्यात बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ, तेलुगु व उर्दू या भाषांचा समावेश आहे. अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस स्मार्टफोनमध्ये या अ‍ॅपचा उपयोग करता येईल. ही सुविधा आॅफलाइनही असणार आहे. म्हणजेच इंटरनेट नसतानाही या फिचरचा उपयोग केला जाऊ शकतो.
मात्र, हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अधिकाधिक भारतीय नागरिकांना त्यांच्या भाषेत सूचना आणि माहिती मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. गुगलने आपल्या कॉन्व्हर्सेशन मोडचा (संभाषण) विस्तार केला असून, यात बंगाली आणि तामिळ भाषेचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीची सर्व फिचर हिंदी भाषेत आधीपासूनच आहेत. आता त्यात अन्य भाषांची भर पडली आहे.

छापील मजकुराचाही होणार अनुवाद
या अ‍ॅपद्वारे एखाद्या भाषेतील छापील मजकुराचाही अनुवाद करता येईल. यासाठी कॅमेरा त्या मजकुराच्या प्रतिमेवर ठेवावा लागेल. त्याचा
अनुवाद फोनच्या स्क्रीनवर पाहता येईल. उदाहरणार्थ, रस्त्यांवरील इंग्रजीतील बोर्डाचा मजकूर या अ‍ॅपच्या माध्यमातून हिंदी व अन्य भाषेत दिसू लागेल.

गुगलची व्याप्ती
गुगल ही अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कॅलिफोर्नियात मुख्यालय असून इंटरनेट सर्च, कॉम्युटर सॉफ्टवेअरमध्ये ती कार्यरत आहे. ४ सप्टेंबर १९९८ रोजी कंपनीची स्थापना झाली. भारतीय वंशाचे सुंदर पिचई कंपनीचे सध्याचे सीईओ आणि सह संस्थापक आहेत. या कंपनीचे ५७,१०० कर्मचारी आहेत.

Web Title: The Google Translate app will also be translated into more than seven languages, including offline, Marathi, Tamil, Bengali and Urdu.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत