गुगलची मशीन लर्निंग एज्युकेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 05:52 IST2018-03-02T05:52:25+5:302018-03-02T05:52:25+5:30
आपली ‘मशीन लर्निंग एज्युकेशन’ सुविधा सर्वांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. गुगलच्या वतीने शुक्रवारी ‘लर्न विथ गुगल एआय’ ही सुविधा सुरू केली ज्यात याचा समावेश आहे.

गुगलची मशीन लर्निंग एज्युकेशन
नवी दिल्ली : आपली ‘मशीन लर्निंग एज्युकेशन’ सुविधा सर्वांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. गुगलच्या वतीने शुक्रवारी ‘लर्न विथ गुगल एआय’ ही सुविधा सुरू केली ज्यात याचा समावेश आहे. यामुळे लोकांना संकल्पना, विकासक कौशल्ये आणि वास्तविक जगातील समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर कसा करावा, हे शिकता येईल. गुगलच्या या सुविधेचे कार्यक्रम व्यवस्थापक झुरी केम्प यांनी सांगितले की, ही सुविधा मोफत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवी हितासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.