दुर्मिळ! तीन हात आणि तीन पायांच्या बाळाचा जन्म, दैवी चमत्कार समजून लोकांची मोठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 12:40 PM2021-12-31T12:40:36+5:302021-12-31T12:42:48+5:30

Unique Child Born Three Hand Three Leg : तीन हात-पाय असलेलं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. 

gopalganj unique child born three hand three leg doctor | दुर्मिळ! तीन हात आणि तीन पायांच्या बाळाचा जन्म, दैवी चमत्कार समजून लोकांची मोठी गर्दी 

दुर्मिळ! तीन हात आणि तीन पायांच्या बाळाचा जन्म, दैवी चमत्कार समजून लोकांची मोठी गर्दी 

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहारच्या गोपाळगंजमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. तीन पाय, तीन हात असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेने सर्वच हैराण झाले असून बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. तर काही जण मुलाच्या पाया पडण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. तीन हात-पाय असलेलं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वैकुंठपूर येथील रेवतिथमध्ये राहणारे मोहम्मद रहीम अली यांच्या 30 वर्षीय पत्नी रबीना खातून यांना प्रसुतीकळा सुरू झाल्या. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांनी तीन हात आणि तीन पाय असलेल्या बाळाला जन्म दिला. डॉक्टर आफताब आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंड्रोममुळे एबनॉर्मल बाळाचा जन्म झाला आहे. एक लाखांमध्ये अशी एखादीच केस असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 

आश्चर्याची बाब म्हणजे कुटुंबीयांनी अल्ट्रासाऊंड केलं होतं. मात्र रिपोर्टमध्ये याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. बाळाची अवस्था गंभीर असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना देखील थोडा धक्का बसला आहे. तीन हात आणि पाय असलेलं हे बाळ सध्या सर्वत्र कुतुहलाचा विषय झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

Web Title: gopalganj unique child born three hand three leg doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.