जरीपटका पोलीस दिल्लीला रवाना

By admin | Published: July 20, 2015 11:59 PM2015-07-20T23:59:24+5:302015-07-20T23:59:24+5:30

नागपूर : इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्यांच्या बँक खात्याचा अहवाल तपासण्यासाठी जरीपटका पोलिसांचे एक पथक सोमवारी दिल्लीकडे रवाना झाले.

Gopalpur police leave for Delhi | जरीपटका पोलीस दिल्लीला रवाना

जरीपटका पोलीस दिल्लीला रवाना

Next
गपूर : इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्यांच्या बँक खात्याचा अहवाल तपासण्यासाठी जरीपटका पोलिसांचे एक पथक सोमवारी दिल्लीकडे रवाना झाले.
वेगवेगळे आमिष दाखवून ऑनलाईन चिटिंग करणाऱ्या टोळीतील लैसराम हेमंतासिंह वय ३०, बिसनपूर, मणिपूर), थाउदम चिंगलेनशना सिंह (वय २२, रा. इम्फाल मणिपूर), नितीन युमनाम सिंह (वय २४, रा. कोटला मुबारकपूर, दिल्ली), नगांगबाम अमरजितसिंह, संडे माइकल मदूबुईके (वय ३३) आणि केनेथ ओकाका (वय ३७, रा. सफदरजंग, दिल्ली) यांना जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील एकाने स्वत:चे नाव डॉ. मोहनसिंग (लंडन) सांगून सेकंड शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एका वैज्ञानिक महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर तिला तीन लाख नऊ हजार रुपयांचा गंडा घातला होता. पीडित महिलेने जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर ठाणेदार दीपक खोब्रागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या सायबर सेलची मदत घेत उपरोक्त आरोपींच्या बुधवारी दिल्लीत मुसक्या बांधल्या. ते सध्या जरीपटक्याच्या कस्टडीत आहेत. त्यांच्याकडे अनेक बँकांचे एटीएम कार्ड सापडले. या टोळीतील सदस्यांचे दिल्लीतील २५ पेक्षा जास्त बँकांमध्ये खाती आहेत. या खात्यांचा अहवाल घेण्यासाठी आणि अन्य आरोपींचा छडा लावण्यासाठी जरीपटक्याचे पोलीस पथक दिल्लीकडे रवाना झाले.
----

Web Title: Gopalpur police leave for Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.